बाळासाहेबांचं कार्य प्रेरणादायीच, नरेंद्र मोदींनी वाहिली आदरांजली

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं कार्य आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरलं, असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली आहे.  

Updated: Nov 17, 2014, 10:13 AM IST
बाळासाहेबांचं कार्य प्रेरणादायीच, नरेंद्र मोदींनी वाहिली आदरांजली title=

नवी दिल्ली: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं कार्य आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरलं, असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली आहे.  

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा दुसरा स्मृतीदिन असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे बाळासाहेबांना यांना आदरांजली वाहिली. 'नेहमी लोकांसाठी जगलेल्या आणि त्यांच्या भल्यासाठी लढणाऱ्या बाळासाहेबांना मी अभिवादन करतो' असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

विधानसभा निवडणुकीपासून भाजपा आणि शिवसेनेमध्ये वितुष्ट निर्माण झालं आहे. शिवसेनेनं भाजपावर अत्यंत तिखट शब्दात हल्ला केला असून भाजपानंही शिवसेनेला चांगलेच तंगवून ठेवलं. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट शिवसेना आणि भाजपामधील तणाव कमी करु शकतं. मोदींच्या ट्विटनंतर भाजपाचे वरिष्ठ नेते शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेतील का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.  

On Pujya Balasaheb Thackeray's Punya Tithi, I salute the great man who always lived for the people & stood for their well-being.

— Narendra Modi (@narendramodi) November 16, 2014

The life of Pujya Balasaheb Thackeray continues to inspire us. He lives in the hearts of millions.

— Narendra Modi (@narendramodi) November 16, 2014

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.