shiv sena

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, शिवसेनेकडून तीन नावे?

केंद्रातील मोदी सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होत आहे. शिवसेनेला मंत्रिपद देण्याची  भाजपने तयारी दाखविली आहे. तुमच्याकडील नावे देण्यासाठी भाजपकडून विचारणा करण्यात आली. मात्र, शिवसेनेकडून प्रतिसाद मिळत नव्हता. महाराष्ट्रातील तिढा जोपर्यंत सुटत नाही. तोपर्यंत सहभागाबाबत सेनेकडून सांगण्यात येत नव्हते. दरम्यान, सेनेकडून तीन जणांच्या नावांची यादी पाठविण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Nov 8, 2014, 12:59 PM IST

'सत्तेसाठी शिवसेना हातात कटोरा घेऊन बाजारात फिरणार नाही'

सत्तेसाठी शिवसेना हातात कटोरा घेऊन बाजारात फिरणार नाही असं शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी म्हटलंय. तसंच याचवेळी राऊतांनी काँग्रेस नेते नारायण राणे यांचाही खरपूस समाचार घेतलाय. सत्तेसाठी राणेंनी पक्षश्रेष्ठींची लाचारी केल्याचा आरोप राऊतांनी केलाय. 

Nov 6, 2014, 02:46 PM IST

सेना सरकारमध्ये सामील होण्यात तिढा

शिवसेना सरकारमध्ये सामील होण्याचा तिढा आणखी वाढलाय. कारण आधी विश्वासदर्शक ठराव होईल आणि मग मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.

Nov 5, 2014, 10:09 PM IST

शिवसेना विरोधी पक्षात बसणार- सूत्र

शिवसेना-भाजप युती संदर्भात चर्चा सुरू असतांनाच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार नाहीय. त्यांनी विरोधी बाकावर बसण्याचं निश्चित केल्याचं समजतंय. 

Nov 5, 2014, 11:01 AM IST

शिवसेनेत चलबिचल, रत्नागिरीचे आमदार उदय सामंतांची दांडी

 एकविरा देवीच्या दर्शनाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेचे एक सोडून सर्व आमदार उपस्थित होते. मात्र यावेळी उदय सामंत अनुपस्थित होते. सामंत यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं. ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. मात्र आपण मतदारसंघातल्या दौ-यामुळे अनुपस्थित असल्याचं स्पष्टीकरण सामंत यांनी दिलं आहे.

Nov 5, 2014, 08:19 AM IST

शिवसेना-भाजपची आज अंतिम चर्चा

शिवसेना सत्तेत सामील होणार की नाही, शिवसेनाला नेमकी कोणती मंत्रिपदं मिळणार याचा फैसला आज होण्याची शक्यता आहे. कारण शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये आज यावर अंतिम बैठक होणार आहे.

Nov 4, 2014, 09:25 PM IST

सेना सत्तेसाठी लाचार – नारायण राणे

शिवसेना एवढी लाचार होऊ शकते याची मी कल्पना करू शकत नाही, अशी कडाडून टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केली.

Nov 4, 2014, 04:51 PM IST

मनसेच्या वसंत गितेंना घेण्यासाठी सेना, भाजपात चढाओढ

 मनसेच्या वसंत गीतेंना खेचण्यासाठी शिवसेना-भाजपमध्ये चढाओढ पक्षाच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला. ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी शिवसेना आणि भाजप नेत्यांची चढाओढ दिसून येत आहे.

Nov 4, 2014, 12:22 PM IST