शिवसेनाप्रमुखांचा दुसरा स्मृतिदिन, शिवसेनेचं शक्तिप्रदर्शन!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनाच्या निमित्त शिवाजी पार्कमधील त्यांच्या स्मृतिस्थळावर शिवसेनेनं शक्तिप्रदर्शन करायचं ठरवलं आहे. विधानसभा निवडणुकीत युतीत ताणल्या गेलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमिवर भाजप नेते स्मृतिस्थळावर बाळासाहेबांना आदरांजली अर्पण करायला येणार का? याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

Updated: Nov 16, 2014, 03:56 PM IST
शिवसेनाप्रमुखांचा दुसरा स्मृतिदिन, शिवसेनेचं शक्तिप्रदर्शन! title=

मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनाच्या निमित्त शिवाजी पार्कमधील त्यांच्या स्मृतिस्थळावर शिवसेनेनं शक्तिप्रदर्शन करायचं ठरवलं आहे. विधानसभा निवडणुकीत युतीत ताणल्या गेलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमिवर भाजप नेते स्मृतिस्थळावर बाळासाहेबांना आदरांजली अर्पण करायला येणार का? याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.

शिवसैनिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारं एकच नाव शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे… सोमवारी १७ नोव्हेंबरला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. पण आज बाळासाहेब आपल्यात नाहीत, असं मान्य करायला शिवसैनिक तयार नाहीत. आंदोलन असो की निवडणुकीचा प्रचार शिवसैनिकांकडून एकच वाक्याचा जयघोष सतत होतांना आढळतो. तो म्हणजे सरसेनापती हिंदू हृदयसम्राट सम्राट माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. बाळासाहेबांबद्दल असलेला आदर, प्रेम शिवसैनिकांच्या मनातून तसूभरही कमी झालेलं नाही. त्यामुळं आपल्या लाडक्या लोकप्रिय नेत्याला अभिवादन करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक मोठ्या संख्येनं शिवाजी पार्कवर त्यांच्या स्मृतिस्थळावर येत आहेत. शिवसैनिकांची होणारी गर्दी लक्षात घेता सुरक्षा आणि सुविधेच्या दृष्टीनं मुंबई महापालिका आणि पोलीस दलानं आपली यंत्रणा सुसज्ज केलीय. या  यंत्रणेत सहभागी होत शिवसैनिक सहकार्य करणार आहेत. 

बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम शिवसैनिक करतायेत. तसा राज्यभरात सेवाभावी उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. विशेषत: युवासेनेनं ठिकठिकाणी रक्तदान शिबीराचं आयोजन केलंय.

गेल्या वर्षी म्हणजेच पहिल्या स्मृतिदिनाला देशातील राजकारण, समाजकारण, उद्योग, सिने, नाट्य अशा विविध क्षेत्रातील नामवंतांनी स्मृतिस्थळावर शिवसेनाप्रमुखांना आदरांजली अर्पण केली होती. मात्र यंदा परिस्थिती थोडी वेगळी आहे. विशेषत: भाजपच्या बाबतीत ही परिस्थिती म्हणता येईल. लोकभा निवडणुकीत शिवसेना-भाजपनं संयुक्तपणे चांगली कामगिरी केली. मात्र विधानसभा निवडणुकीत हे संबंध बिघडले, शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर निवडणुकीच्या प्रचारामध्ये दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर वार केले अवघ्या देशानं बधितली. 
महाराष्ट्रात भाजपच्या सत्तास्थापनेवेळी दोन्ही पक्षांच्या नेत्यांमधील संवादातील धांदलही सर्वांनी पाहिली. भाजपकडून मिळालेल्या वागणुकीसंदर्भात शिवसैनिकांमध्ये रोष आहे. त्यामुळं स्मृतिदिनी भाजप केंद्रीय आणि राज्यातील नेते उपस्थित राहणार का? याबाबत उत्सुकता आहे. त्याचप्रमाणे शिवसैनिक भाजपच्या नेत्यांबाबत काय पवित्रा घेतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

शिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुखांचं स्मृति उद्यान उभारण्यात आलंय. मात्र शिवसेनाप्रमुखांच्या भव्य स्मृति स्मारकाचं काय? असा सवाल शिवसैनिकांच्या मनात पक्षाच्या नेत्यांना आणि भाजप प्रणित सरकारला विचारण्यासाठी आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.