shiv sena

उद्धव ठाकरेंचं 'एकला चलो रे'चा नारा, चेंडू पुन्हा भाजपच्या कोर्टात

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका स्पष्ट केलीय. भाजप जर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेणार असेल तर शिवसेना विरोधी बाकावर बसेल, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय. तर शिवसेनेचे विधानसभेचे गटनेते म्हणून एकनाथ शिंदेंची निवड करण्यात आलीय. 

Nov 9, 2014, 07:52 PM IST

शिवसेनेला जय महाराष्ट्र करत सुरेश प्रभू भाजपमध्ये!

पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या मंत्रिमंडळात स्थान पटकावणारे सुरेश प्रभू यांनी आज सकाळी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपामध्ये प्रवेश केला. शिवसेनेचे माजी खासदार सुरेश प्रभू यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन भाजपाने शिवसेनेला शह दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.  

Nov 9, 2014, 05:24 PM IST

केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागास शिवसेनेचा नकार

एनडीए सरकारचा आज पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला, नव्या मंत्र्यांना शपथ देण्यात आली, मात्र या शिवसेनेने केंद्रीय मंत्रिमंडळात समावेशास नकार दिला आहे. मात्र सुरेश प्रभु यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावरून सुरेश प्रभु यांच्या हकालपट्टीची मागणी वाढतेय. सुरेश प्रभु हे शिवसेनेचे उपनेते आहेत.

Nov 9, 2014, 02:32 PM IST

शिवसेनेत अनिल देसाईंवरून असंतोष

राज्यसभेतून निवडून आलेले शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागणार ही बातमी आल्यानंतर शिवसेनेत असंतोष पेटण्याची चिन्हं दिसून येत आहेत.

Nov 9, 2014, 12:32 PM IST

शिवसेनेचे खासदार अखेर शपथ घेणार

केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज पहिला विस्तार आहे, शिवसेनेचे खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पण पंतप्रधानांच्या चहापानाच्या कार्यक्रमावर शिवसेना खासदारांचा बहिष्कार असणार असल्याचं सांगण्यात येतंय.

Nov 9, 2014, 10:43 AM IST

शिवसेनेचे खासदार अनिल देसाई दिल्लीकडे रवाना

नरेंद्र मोदी सरकारचा आज दुपारी मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आहे. शिवसेनेचे खासदार अनिल देसाई दिल्लीकडे रवाना झाल्याने, त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेशाची शक्यता वाढल्याने, शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्यास भाजपला सोप झालं असल्याचं बोललं जातंय.

Nov 9, 2014, 10:19 AM IST

भाजपला कोंडीत पकडण्यासाठी सेनेची राष्ट्रवादीशी चर्चा

भाजपला कोंडीत पकडण्यासाठी सेनेची राष्ट्रवादीशी चर्चा

Nov 8, 2014, 07:13 PM IST

शिवसेना आक्रमक, भाजपला कोंडीत पकडण्यासाठी राष्ट्रवादीशी चर्चा

शिवसेनेच्या काही आमदारांनी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती मिळतेय. तर सेना नेते संजय राऊत यांनी मात्र या बातमीचा इन्कार केलाय. दरम्यान, आम्हाला शिवसेनेचे प्रतिनिधी  भेटलेत, अशी कबुली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.

Nov 8, 2014, 02:55 PM IST

भाजपला हवेत सुरेश प्रभू, शिवसेनेची 'सन्मानजक' नवी खेळी

महाराष्ट्रात सरकारमध्ये सन्मानजक स्थान दिलं तरच शिवसेना केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तार कार्यक्रमाला उपस्थित राहील, अशी भूमिका शिवसेनेकडून घेण्यात आली आहे. भाजपबरोबर सेनाही अधिक आक्रमक झाली आहे.

Nov 8, 2014, 02:24 PM IST