shiv sena

सीताराम कुंटेंच्या जागी मुंबई महापालिका आयुक्तपदी अजय मेहता!

 सीताराम कुंटेंच्या जागी  बीएमसीच्या आयुक्तपदी अजय मेहता यांची नियुक्ती होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. ३० एप्रिलच्या दरम्यान या नियुक्तीची शक्यता आहे. मेहता सध्या पर्यावरण विभागाचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. मेहता आणि गृहनिर्माण विभागाचे सतीश गवई या दोघांची नावं चर्चेत आहेत. मात्र मेहता यांचंच नाव निश्चित असल्याचं बोललं जातंय. 

Apr 27, 2015, 09:07 AM IST

युतीत वितुष्ट: सेना-भाजप दोघांकडून महापौरपदासाठी अर्ज दाखल

औरंगाबादच्या महापौर पदावरून युती पुन्हा विभक्त होणार असं चित्र निर्माण झालंय. शिवसेना आणि भाजपकडून महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळं आता महापौर कुणाचा हाच औरंगाबादच्या राजकारणातील चर्चेचा विषय ठरतोय.

Apr 26, 2015, 11:07 AM IST

मुंबईतले गुन्हे वाढण्यामागे परप्रांतीय समाजकंटक : शिवसेना

मुंबईतील गुन्हे वाढण्यामागे परप्रांतीय हा घटक सुद्धा जबाबदार असल्याचा आरोप, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केलाय. आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी असा आरोप केला होता. आता शिवसेनेने केल्याने वाद उद्धभवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Apr 25, 2015, 05:14 PM IST

औरंगाबाद महापौराचा तिढा कायम, बैठकीत तोडगा नाही

औरंगाबाद महापालिका महापौरपदाचा तिढा सुटण्याची काही चिन्हं अजून दिसत नाहीत. याच मुद्यावर सकाळी मुंबईत युतीची बैठक झाली. मात्र बैठकीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहे दानवे आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी पत्रकारांशी बोलणं टाळलं. 

Apr 25, 2015, 04:17 PM IST

औरंगाबाद महापौर पदावर भाजपचा दावा, शिवसेनेला अमान्य

औरंगाबाद पालिकेत काठावर का होईना महापालिकेत युतीची सत्ता येणार, असं चित्र निर्माण झालंय. युतीतले दोन्ही भागीदार बंडखोरांचा पाठिंबा आम्हालाच असल्याचा दावा करतायत. त्याच्याच जोरावर आता भाजपनं महापौरपदावर दावा केलाय. आमचं संख्याबळ वाढलं असल्याचं सांगत महापौर आमचाच असणार असं भाजप नेते सांगतायत.

Apr 24, 2015, 06:44 PM IST

पालिका निवडणूक : घराणेशाहीचा विजय; ७ दाम्पत्य, २ पिता-पुत्र विजयी

महानगरपालिका निवडणुकीत घराणेशाहीचा पुन्हा एकदा प्रत्ययआलाय.  यंदा सर्वपक्षीयांनी राजकारणाचा वारसा असलेल्यांच्या घरात अनेकांना तिकीट देण्याची राजकीय खेळी केली. ती त्यांच्या पथ्यावर पडली आहे. यामध्ये शिवसेनेने बाजी मारल्याचे दिसत आहे. 

Apr 23, 2015, 11:04 PM IST

अंबरनाथ, बदलापुरात शिवसेनेची मुसंडी; अपक्षांच्या साथीने सत्ता

 अंबरनाथ, बदलापूर या दोन्ही नगरपरिषदांमध्ये शिवसेनेनं जोरदार मुसंडी मारत सत्ता मिळवलीय. बदलापूरमध्ये शिवसेनेला निर्विवाद बहुमत मिळालंय. तर अंबरनाथमध्ये शिवसेना सत्तास्थापनेपासून तीन जागा दूर आहे. पण अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापना करणं शिवसेनेसाठी सहज शक्य होणार आहे. 

Apr 23, 2015, 08:19 PM IST

गणेश नाईक यांची २० वर्षांपासून एकहाती सत्ता

नवी मुंबई, औरंगाबाद महापालिका आणि अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या निकालानंतरचा जल्लोष करण्यात येत आहे. नवी मुंबईत घराणेशाहीचा पुन्हा एकदा विजय झालाय. बदलापूर आणि अंबरनाथमध्ये शिवसेनेला बहुमत मिळाले. तर औरंगाबादमध्ये सहाव्यांदा महापालिकेवर भगवा फडकणार आहे.

Apr 23, 2015, 07:58 PM IST