नवी मुंबई : महानगरपालिका निवडणुकीत घराणेशाहीचा पुन्हा एकदा प्रत्ययआलाय. यंदा सर्वपक्षीयांनी राजकारणाचा वारसा असलेल्यांच्या घरात अनेकांना तिकीट देण्याची राजकीय खेळी केली. ती त्यांच्या पथ्यावर पडली आहे. यामध्ये शिवसेनेने बाजी मारल्याचे दिसत आहे.
७ दाम्पत्यांनी निवडणुकीत विजय मिळवला असून २ पिता-पुत्र आणि २ बाप-लेकींनी महापालिका गाठली आहे. यामुळे नवी महापालिकेत 'घराणेशाही' दिसणार आहे.
मढवी परिवारातील मनोहर मढवी यांच्यासह त्यांची पत्नी विनया आणि मुलगा करण हे तिघेही विजयी झाले आहेत. तर, गवते परिवारातील ४ जणं नवी मुंबई महापालिकेसाठी निवडून गेले आहेत.
विजयी दाम्पत्य-
अनिता पाटील आणि त्यांचे पती शिवराम पाटील (शिवसेना)
कोमल वास्कर आणि त्यांचे पती सोमनाथ वास्कर (शिवसेना)
मनोहर मढवी आणि पत्नी विनया मढवी (शिवसेना)
शुभांगी गवते आणि त्यांचे पती जगदीश गवते (शिवसेना)
राधा कुलकर्णी आणि त्यांचे पती सुरेश कुलकर्णी (राष्ट्रवादी)
नवीन गवते आणि त्यांच्या पत्नी अपर्णा गवते (राष्ट्रवादी)
रंजना सोनावणे आणि त्यांचे सुधाकर सोनावणे (अपक्ष )
बाप-लेक विजयी
विजय चौगुले आणि ममीत चौगुली (शिवसेना)
एम के मढवी आणि करण मढवी (शिवसेना)
अशोक गावडे आणि स्वप्ना गावडे (राष्ट्रवादी)
नामदेव भगत (शिवसेना) त्यांची मुलगी पूनम पाटील (काँग्रेस)
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.