कल्याण : शिवसेना उद्या कल्याण डोंबिवलीच्या महापौरपदासाठी दावा करण्याची शक्यता आहे... शिवसेनेकडून दीपेश म्हात्रे आणि रमेश म्हात्रे हे दोघे महापौरपदासाठी अर्ज भरणार असल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेना महापौरपदासाठी २ उमेदवार देऊन सत्तेसाठी दावा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मनसे उद्या गट स्थापन करणार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत ९ जागा मिळाल्या आहेत. गेल्या निवडणुकीपेक्षा कमी यश मिळाले तरी त्यांना महत्त्व कायम आहे. उद्या पक्ष आपला ९ नगरसेवकांचा गट स्थापन करणार आहे.
शिवसेनेच्या गळाला ८ नगरसेवक
४ अपक्ष नगरसेवक, काँग्रेसचे ३ आणि राष्ट्रवादीचा १ नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागल्याचं पुढे आलंय. त्यामुळे सेनेचं संख्याबळ ५९च्या घरात पोहोचतंय.
भाजपकडे ५२ संख्याबळ
भाजपा मात्र स्वतःचे ४२ आणि २७ गाव संघर्ष समितीचे ९ जण असे ५२ जण असल्याचा दावा करतंय. त्यामुळं शिवसेना सत्तेच्या अधिक जवळ पोहोचल्याचं चित्र निर्माण झालंय.
भाजपला संघर्ष टाळायचा
अशा स्थितीत मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपनं शिवसेनेशी संघर्ष टाळायचा ठरवल्याचं बोललं जातंय. महापौरपदावरचा दावा भाजपनं मागे घेतला तर शिवसेनेला सत्ता स्थापन करणं अधिक सोपं होणार आहे. भाजप थेट शिवसेनेला पाठिंबा देऊन स्थायी समितीसह काही महत्त्वाची पदं पदरात पाडून घेणार की विरोधी पक्षात बसणं पसंत करणार, याची उत्सुकता आहे.
मात्र भाजपनं पाठिंबा न दिल्यास जादुई आकडा गाठण्यासाठी शिवसेनेला मनसेची मदत घ्यावी लागेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.