शिवसेनेची धमकी, गुलाम अली लखनऊला आले तर कुलकर्णींपेक्षा वाईट हालत करू

 लखनऊ महोत्सवात सुप्रसिद्ध गझल गायक गुलाम अली यांचा कार्यक्रम झाला तर त्यांची हालत सुधींद्र कुलकर्णी यांच्यापेक्षा वाईट करू असा धमकी शिवसेनेने दिली आहे. 

Updated: Nov 6, 2015, 10:05 PM IST
शिवसेनेची धमकी, गुलाम अली लखनऊला आले तर कुलकर्णींपेक्षा वाईट हालत करू title=

लखनऊ :  लखनऊ महोत्सवात सुप्रसिद्ध गझल गायक गुलाम अली यांचा कार्यक्रम झाला तर त्यांची हालत सुधींद्र कुलकर्णी यांच्यापेक्षा वाईट करू असा धमकी शिवसेनेने दिली आहे. 

शिवसेनेचे उत्तर प्रदेशचे अध्यक्ष अनिल सिंग म्हणाले, 'सीमेवर आमचे जवान मारले जात आहेत आणि आम्ही पाकिस्तानी गायकांच्या गझला ऐकणे, हे शिवसेनेला मान्य नाही. 

विशेष म्हणजे स्वतः गुलाम यांनी भारतातील आपले सर्व कार्यक्रम रद्द केले होते. पण स्थानिक प्रशासनाने त्यांची मनधरणी करून लखनऊ महोत्सवातील तीन दिवसीय कार्यक्रमासाठी त्यांना राजी केले होते. त्यानंतर गुलाम अली यांनी येण्यास नकार दिला. 

यापूर्वी शिवसेनेच्या विरोधानंतर गुलाम अली यांचा मुंबईतील कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. तसेच पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री कसूरी यांच्या पुस्तक प्रकाशनापूर्वी भाजप नेते सुधींद्र कुलकर्णी यांच्या चेहऱ्यावर शिवसैनिकांनी काळी शाई टाकली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.