नवी दिल्ली : पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्ताननं पुन्हा एकदा कायदेशीर मदत नाकारली आहे.
कुलभूषण जाधव यांचा खटला लढण्यासाठी त्यांना कायदेशीर मदतीची गरज आहे. आणि ही मदत त्यांना मिळावी, यासाठी भारताने आतापर्यंत पाकिस्तानला चौदा वेळा विनंती केली. ती पाकिस्ताननं पुन्हा फेटाळून लावली आहे.
कुलभूषण जाधव यांना सबळ पुराव्याआधारेच देहदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याबद्दल काही संशय असेल तर पाकिस्तान सर्व शक्तीनिशी सबळ पुराव्याआधारेच हा खटला लढवेल, असे पाकिस्तानी लष्कराने स्पष्ट केले आहे.