श्रीनगर येथे जवानांवर हात उचलणाऱ्या 'त्या' तरुणांची धरपकड

सीआरपीएफच्या जवानांना मारहाण करणाऱ्या त्या तरुणांची ओळख पटली आहे. त्यांच्यावर कारवाईला सुरुवात झाली आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 14, 2017, 02:24 PM IST
श्रीनगर येथे जवानांवर हात उचलणाऱ्या 'त्या' तरुणांची धरपकड  title=

 श्रीनगर : सीआरपीएफच्या जवानांना मारहाण करणाऱ्या त्या तरुणांची ओळख पटली आहे. त्यांच्यावर कारवाईला सुरुवात झाली आहे. 

श्रीनगरमध्ये रस्त्यावरुन शांतपणे चालत असलेल्या लष्करी जवानांवर काही तरुणांची हात उचलत मारहाण केली होती. याबाबत तीव्र संताप व्यक्त होत होता. मारहाण करणारे तरुण मोबाईलद्वारे शुटींगही करत होते. याचा व्हिडिओ हाती लागल्यानंतर मारहाण करणाऱ्या बदमाश लोकांचा तपास करण्यात आला.

देशसेवेचा अपमान करणाऱ् याया काश्मिरी तरुणांना अटक करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जवानांवर हात उचलणारे काश्मिरी तरुण बडगाम जिल्ह्यातील क्रालपोरा परिसरातील राहणारे आहेत. पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी सीआरपीएफने केलेल्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल करण्यात आला होता.

जवान जे पूर्णपणे सशस्त्र होते. त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता शांतपणे चालत राहणे पसंत केलं. आपल्याकडे असलेले एव्हीएम सुरक्षितपणे पोहोचवणे हा आपला मुख्य हेतू असल्याने इतर कोणत्याही गोष्टीकडे जवानांनी लक्ष दिले नाही.