नवी दिल्ली : नोटाबंदीचा निर्णय दीर्घकालीन भविष्यात भारतीय अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरेल असं भाकित जागतिक बँकेनं वर्तवले आहे.
नोटाबंदीमुळे सुरूवातीच्या काळात जरी अर्थव्यवस्थेच्या विकासदराला खीळ बसली हे सत्य आहे. पण भविष्यात याचे चांगले परिणाम बघायाला मिळतील असंही जागतिक बँकेच्या दक्षिण आशियाई अर्थव्यवस्थांविषयीच्या ताज्या अहवालात म्हटले आहे.
शिवाय एप्रिल 2017 पासून सुरू झालेल्या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर 7.2 टक्के राहील असंही अहवालात म्हटलंय. तर पुढच्या आर्थिक वर्षात म्हणजे एप्रिल 2018 ते मार्च 2019 या आर्थिक वर्षात विकासाचा दर 7.5 टक्कांपर्यंत वर जाण्याचं भाकित जागतिक बँकेनं वर्तवले आहे.
जीएसटी करप्रणालीच्या अंमलबजाणीमुळेही भारतीय अर्थव्यवस्थेला नवी उभारी मिळेल, असे जागतिक बँकेने आपले मत व्यक्त केले आहे.