भारतातील आयटी क्षेत्राला धक्का, अमेरिकेच्या H1B व्हिसात बदल

H1B व्हिसासंदर्भातल्या नव्या अध्यादेशावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सही केली आहे. नवा कायदा आणि कडक नियमामुळे भारतीय आयटी कंपन्यांना याचा फटका बसणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 19, 2017, 11:22 AM IST
भारतातील आयटी क्षेत्राला धक्का, अमेरिकेच्या H1B व्हिसात बदल title=

वॉशिंग्टन : H1B व्हिसासंदर्भातल्या नव्या अध्यादेशावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सही केली आहे. नवा कायदा आणि कडक नियमामुळे भारतीय आयटी कंपन्यांना याचा फटका बसणार आहे.

डॉनाल्ड ट्रम्प यांनी आज भारतीय आयटी उद्योगांसाठी मारक ठरणाऱ्या एका अध्यादेशावर स्वाक्षरी केली आहे. अमेरिकेत नोकरी करण्यासाठी आवश्यक असणारा H1B प्रकारचा व्हिसा मिळवण्यासाठी आता अत्यंत कठोर अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत.

ट्रम्प यांनी सही केलेल्या अध्यादेशामुळे अमेरिकन व्यवसाय करणाऱ्या सर्व कंपन्यांना H1B व्हिसा मिळवण्यासाठी परदेशी नागरिकाला उच्च पगाराची नोकरी द्यावी लागेल. शिवाय त्या नागरिकाकडे असणारी कौशल्य जर अमेरिकन नागरिकाकडे असतील, तर अमेरिकन नागरिकाला प्रथम संधी द्यावी लागेल.

यामुळे अर्थाच भारतीय आयटी कंपन्यांचा खर्च तर वाढणार आहेच त्याचप्रमाणे नफ्यावरही वाईट परिणाम होण्याची शक्यताय. अमेरिकन नागरिकांमधलं वाढती बेरोजगारी कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प प्रशासानाचं म्हणणं आहे.