दार्जिलिंग पेटले : आंदोलकांचा ममता सरकारशी बोलण्यास नकार, मात्र मोदींशी तयारी

स्वतंत्र गोरखालँड मागणीसाठीचं आंदोलन दिवसागणिक चिघळतच आहे. गोरखालँड जनमुक्ती मोर्चा म्हणजेच जीजेएमनं पश्चिम बंगाल सरकारशी कोणतीही चर्चा करायला नकार दिला आहे. मात्र त्याचवेळी केंद्र सराकरशी बोलणी करण्यासाठी अनुकूलता दाखवली आहे. 

PTI | Updated: Jun 18, 2017, 12:58 PM IST
दार्जिलिंग पेटले : आंदोलकांचा ममता सरकारशी बोलण्यास नकार, मात्र मोदींशी तयारी title=

दार्जिलिंग/कोलकाता : स्वतंत्र गोरखालँड मागणीसाठीचं आंदोलन दिवसागणिक चिघळतच आहे. गोरखालँड जनमुक्ती मोर्चा म्हणजेच जीजेएमनं पश्चिम बंगाल सरकारशी कोणतीही चर्चा करायला नकार दिला आहे. मात्र त्याचवेळी केंद्र सराकरशी बोलणी करण्यासाठी अनुकूलता दाखवली आहे. 

स्वतंत्र गोरखालँड राज्याच्या मागणीसाठी गेल्या १० दिवसांपासून दार्जिलिंगमध्ये आंदोलन पुकारण्यात आलं आहे. दरम्यान शनिवारी जीजेएमनं काही ठिकाणी दगडफेक तसंच पेट्रोल बॉम्ब फेकले. त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पश्चिम बंगाल पोलिसांना अश्रूधुराचा मारा करावा लागला होता. त्यानंतर परिस्थिती हाताळण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे.

लष्कराच्या सहा तुकड्यांनी दार्जिलिंगसह इतर भागांत ध्वजसंचलन केलं. या प्रकरणात आतापर्यंत एकाचा मृत्यू झालाय, तर ३५ पोलीस जखमी झालेत. त्यापैकी १९ जणांची प्रकृती गंभीर आहे. या आंदोलनाची गंभीर दखल घेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींशी चर्चा करुन अधिक माहिती घेतली.