इराण संसदेत दहशतवादी हल्ला, तीन जण जखमी

इराणची राजधानी तेहरानमध्ये आज दहशतवाद्यांनी दोन हल्ले केलेत. इराणच्या संसदेत घुसून एका दहशतवाद्यानं बेछुट गोळीबार केला. तर दुसरी कडे इराणाचे संस्थापक रोहुल्ला खोमेनी यांच्या मजारीच्या ठिकाणी आत्मघातकी स्फोट घडवून आणला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 7, 2017, 02:16 PM IST
इराण संसदेत दहशतवादी हल्ला, तीन जण जखमी title=

तेहरान : इराणची राजधानी तेहरानमध्ये आज दहशतवाद्यांनी दोन हल्ले केलेत. इराणच्या संसदेत घुसून एका दहशतवाद्यानं बेछुट गोळीबार केला. तर दुसरी कडे इराणाचे संस्थापक रोहुल्ला खोमेनी यांच्या मजारीच्या ठिकाणी आत्मघातकी स्फोट घडवून आणला.

पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार एकूण चार हल्लेखोरांनी हे हल्ला केला.  त्यापैकी दोघांनी संसदेवर हल्ला केला. तर एकानं बंदूकधारी तरुणानं संसदेच्या इमारतीमध्ये घुसून गोळीबार केलाय. त्यात तीन जण जखमी झाले. त्यापैकी एकाचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचं आता पुढे येतंय. 

या दहशतवाद्याला चारही बाजूनं घेरण्यात आल्याची माहिती इराण सरकारनं म्हटले आहे. दरम्यान, हल्लेखोरांनी काहीजणांना ओलीस ठेवले असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र अद्याप या माहितीला इराणच्या प्रशासनाकडून कोणताही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.