गुडन्यूज : स्टेट बॅंकेने या शुल्कात केली ७५ टक्के कपात, उद्यापासून मिळणार फायदा

तुमचे स्टेट बॅंक ऑफ इंडिया या बॅंकेत खाते असेल तर तुमच्यासाठी गुडन्यूज आहे. एसबीआयने इमिजिएट पेमेंट सर्व्हिसद्वारे (आयएमपीएस) एक हजार रुपयांपर्यंतची रक्कम पाठविण्यासाठी लागणारे शुल्क रद्द केले आहे. त्याचबरोबर ७५ टक्के शुल्क कपात केलेय. याचा लाभ हा उद्यापासून मिळणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 14, 2017, 11:29 AM IST
गुडन्यूज : स्टेट बॅंकेने या शुल्कात केली ७५ टक्के कपात, उद्यापासून मिळणार फायदा title=

नवी दिल्ली : तुमचे स्टेट बॅंक ऑफ इंडिया या बॅंकेत खाते असेल तर तुमच्यासाठी गुडन्यूज आहे. एसबीआयने इमिजिएट पेमेंट सर्व्हिसद्वारे (आयएमपीएस) एक हजार रुपयांपर्यंतची रक्कम पाठविण्यासाठी लागणारे शुल्क रद्द केले आहे. त्याचबरोबर ७५ टक्के शुल्क कपात केलेय. याचा लाभ हा उद्यापासून मिळणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने नॅशनल फंड ट्रान्सफर (एनईएफटी) आणि रिअल टाईम ग्रॉस डेटलमेंट (आरटीजीएस) शुल्कात ७५ टक्के कपात केली आहे. नव्या शुल्काची अंमलबजावणी १५ जुलैपासून होणार आहे. सुधारित शुल्क इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग सेवेद्वारे करण्यात येणाऱ्या आर्थिक व्यवहारांना लागू असतील, असे बँकेच्या वतीने सांगण्यात आले.

छोट्या आर्थिक व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे बँकेच्यावतीने सांगण्यात आले. एक हजार रुपयांपर्यंतची रक्कम आयएमपीएसमार्फत पाठविण्यासाठी लागू असलेल्या सेवाकरासह ५ रुपयांचे शुल्क एसबीआयकडून आकारण्यात येत होते. हे शुल्क आता लागणार नाही.

ऑनलाईन सेवेचा वापर करताना शुल्क कमी लागणार आहे. छोट्या तिकीट आकारातील आर्थिक व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही एक हजार रुपयांपर्यंतची रक्कम आयएमपीएसवरून हस्तांतरित करण्यासाठी लावण्यात येणारे शुल्क रद्द केले आहे. जीएसटीनंतर बदललेल्या परिस्थितीत बँकेने शुल्क रचनेचा आढावा घेतला. यावेळी हे शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या व्यवहारांवर १८ टक्के

एक हजार रुपयांपर्यंतच्या हस्तांतरण रकमेवर आता कोणतेही शुल्क लागणार नाही. मात्र, एक हजार ते एक लाख रुपये पाठविण्यासाठी ५ रुपये शुल्क लागेल. १ लाख ते २ लाख रुपयांची रक्कम पाठविण्यासाठी १५ रुपयांचे शुल्क लागेल. या सर्व व्यवहारांवर १८ टक्के सेवाकर लागेल, असे एसबीआयने स्पष्ट केलेय.