मोठा हिमनग अंटार्टिकाच्या समुद्रातून विलग, समुद्राच्या पातळीत वाढीचा धोका

मुंबईच्या एकूण क्षेत्रफळाच्या जवळपास नऊ पट मोठा हिमनग अंटार्टिकाच्या समुद्रातून विलग झालाय. यामुळे दक्षिण ध्रुवीय परिसरात असणाऱ्या समुद्राच्या पातळीत मोठा बदल होण्याची भीती व्यक्त होतेय. 

PTI | Updated: Jul 13, 2017, 08:23 AM IST
मोठा हिमनग अंटार्टिकाच्या समुद्रातून विलग,  समुद्राच्या पातळीत वाढीचा धोका title=

लंडन : मुंबईच्या एकूण क्षेत्रफळाच्या जवळपास नऊ पट मोठा हिमनग अंटार्टिकाच्या समुद्रातून विलग झालाय. यामुळे दक्षिण ध्रुवीय परिसरात असणाऱ्या समुद्राच्या पातळीत मोठा बदल होण्याची भीती व्यक्त होतेय. 

मुख्य हिमच्छादित प्रदेशापासून १० जुलै ते १२ जुलैच्या दरम्यान ही हिमनग मुख्य हिमाच्छादित प्रदेशापासून वेगळा झाल्याचं ब्रिटीश अंटार्टिक सर्व्हे या संस्थेनं म्हटलंय.  काही महिन्यांपूर्वी ५ हजार ८०० चौरस किलोमीटरचा हा हिमनग वेगळा होणार असल्याचं शास्त्रज्ञांनी जाहीर केलं होतं.  

सध्या दक्षिण ध्रुवीय कंटिबंधात हिवाळा आहे. त्यामुळे गेल्या उन्हाळ्यात तयार झालेली दरी या हिवाळ्यात आणखी खोल होऊन हिमनग वेगळा होईल असा अंदाज होता. गेल्या काही वर्षात सातत्यानं वाढणाऱ्या तापमानामुळे अंटार्टिका खंडावर मोठा विपरित परिणाम होत आहे.  त्याचीच परिणती हा भला मोठा हिमनग मुख्य खंडापासून वेगळा होण्यात झाली आहे.