10
10
राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारणार आहेत. १६ वर्षांनंतर काँग्रेसला नवं नेतृत्व लाभत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातारवण आहे.
दोन हजारांपर्यंतच्या कॅशलेस खरेदीवर एमडीआरची सवलत मिळणार आहे. डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची १ जानेवारी २०१८ पासून अंमलबजावणी केली जाणार आहे.
भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी श्रीलंका टीममधून लसित मलिंगाला डच्चू देण्यात आलाय. दरम्यान, सीनिअर खेळाडू सुरंगा लकमल आणि लाहिरू थिरिमाने यांना विश्रांती देण्यात आली आहे.
दुबई सुपर सिरिज स्पर्धेत सलग तीन सामने जिंकून भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधु सेमी फायनलमध्ये दाखल झालेय. त्यामुळे भारताला पदकाची आशा कायम आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने टेलिव्हिजनवर दाखवल्या जाणाऱ्या कंडोमच्या जाहिरातींच्या प्रसारणावर निर्बंध घातले आहेत. यापुढे सकाळी सहा ते रात्री दहा वाजपर्यंत कंडोमच्या जाहिराती दाखवण्यावर बंदी घातलीय. ़
तामिळनाडू आणि केरळ राज्याला ओखी चक्रीवादळाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. ओखी या चक्रीवादळाने तामिळनाडू व केरळला जोरदार तडाखा दिला असून, त्यात १२ ठार तर एकूण तीस जण बेपत्ता झाले.
मोदी सरकारने जीएसची लागू केल्यानंतर अनेकांना अडचणीना तोंड द्यावे लागले. तसेच सामान्यांचे कंबरडे मोडल्याचा आरोप
दक्षिण भारताला ओखी चक्रीवादळाने जोरदार दणका दिलाय. या वादळात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे.
जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे. यावर कोणीही शंका घेऊ शकत नाही. दरम्यान, काश्मीर मुद्द्यावर आता पाकव्याप्त काश्मिरात पुन्हा आवाज उठू लागलाय. पाकव्याप्त काश्मिरमधील नेत्यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावलेत.
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यांने दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याआधी खास बीसीसीआयला हे बोल सुनावलेत. तसेच बीसीसीआयच्या नियोजनावर तोंडसुख घेतलेय.