जगायचं तर असं! हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेल्या आजीबाई करू लागल्या Makeup, Video पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेल्या आजीबाई मेकअप करताना दिसतायत. 

पुजा पवार | Updated: Jan 2, 2025, 07:34 PM IST
जगायचं तर असं! हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेल्या आजीबाई करू लागल्या Makeup, Video पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स title=
(Photo Credit : Social Media)

Viral Video :  सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून विविध प्रकारचे व्हिडीओ शेअर केले जातात. कधी कोणी डान्स तर कधी कोणी स्टंट आणि कॉमेडी करून लोकांचं मनोरंजन करतात. बऱ्याचदा काही कॉमेडी व्हिडीओ नेटकऱ्यांना इतकं हसवतात की तो खूप व्हायरल होतो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेल्या आजीबाई मेकअप करताना दिसतायत. 

 सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक वृद्ध महिला हॉस्पिटलच्या बेडवर झोपली आहे. म्हणजेच ती कोणत्या तरी आजारपणावर हॉस्पिटलमध्ये उपचार घेतेय. वृद्ध महिलेच्या नाकात पाईप लावलेला आहे. पण ते म्हणतात ना महिलांच्या हौसेला काही मोल नसतं ते हे असं. हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेल्या या आजीबाई आजारी असूनही त्यांची हौस पूर्ण करताना दिसतायत. व्हिडिओत पाहायला मिळतंय की, हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेल्या आजीबाई या मेकअप करत आहेत. त्या त्यांच्याजवळील लहान आरशात पाहून लिपस्टिक आणि ब्लश लावून मेकअप करताना दिसतायत. 

हेही वाचा : नवीन वर्षात स्वतःला लावा 'या' 5 चांगल्या सवयी, 100 वर्षांपर्यंत राहाल फिट, आजपासूनच सुरुवात करा

पाहा व्हिडीओ : 

हेही वाचा : तुम्हाला फॅन्सी वाटणारी थंडीमधील 'ही' फुगीर जॅकेट्स कशी बनवतात वाचल्यावर बसेल धक्का

@BaissaRathore1 या अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून या व्हिडीओला 'वयाने काही फरक पडत नाही, तुमचे मन महत्वाचे आहे'. तुमच्यावर मनावर आहे तुम्ही कोणत्याही स्थितीत सकारात्मक राहू शकता'. या व्हिडीओला 4 हजारहून जास्त व्यूज मिळाले आहेत. व्हिडीओ पाहिल्यावर एका यूजरने कमेंट केलं आहे की, 'नेहमी मनाचं ऐकायला हवं' तर एकाने लिहिले वय फक्त एक संख्या आहे तुम्ही कोणत्याही परिस्थितीत आनंदी आणि उत्साही राहू शकता. एका महिला यूजरने भन्नाट कमेंट करत लिहिले की, 'महिला सजण, शृंगार करणं कधीच विसरत नाहीत'. तर यूजरने लिहिले की, 'यार ही आजी जास्तच सकारात्मक आहेत'.