दुबई सुपर सिरिज : पी. व्ही. सिंधु सेमी फायनलमध्ये दाखल

दुबई सुपर सिरिज स्पर्धेत सलग तीन सामने जिंकून भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधु  सेमी फायनलमध्ये दाखल झालेय. त्यामुळे भारताला पदकाची आशा कायम आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 16, 2017, 07:34 AM IST
दुबई सुपर सिरिज : पी. व्ही. सिंधु सेमी फायनलमध्ये दाखल title=

दुबई : दुबई सुपर सिरिज स्पर्धेत सलग तीन सामने जिंकून भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधु  सेमी फायनलमध्ये दाखल झालेय. त्यामुळे भारताला पदकाची आशा कायम आहे.

पी. व्ही. सिंधुचा सलग तिसरा विजय

रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या सिंधुने दुबई सुपर सिरिज गाजवण्यास सुरुवात केलेय. अ गटातून खेळत असलेल्या सिंधुने जपानच्या अकाने यामागुची हिचा पराभव करत सेमी फायनलमध्ये धडक मारली. सिंधुचा या स्पर्धेतील सलग तिसरा विजय आहे.

सलग दोन सेटमध्ये सामना जिंकला

सिंधु आणि यामागुची यांच्यात ३६ मिनिटांचा सामना झाला. सिंधुने हा सामना २१-९ आणि २१-१३ असा सलग दोन सेटमध्ये जिंकला. याआधी अ गटातील आपल्या पहिल्या सामन्यात सिंधुने चीनच्या बिंगजियाओ हिचा आणि दुसऱ्या सामन्यात जपानच्या सायाको साटो हिचा पराभव केला होता.