राहुल गांधींकडे अध्यक्षपदाची सूत्रं, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह

राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारणार आहेत. १६ वर्षांनंतर काँग्रेसला नवं नेतृत्व लाभत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातारवण आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 16, 2017, 11:22 AM IST
राहुल गांधींकडे अध्यक्षपदाची सूत्रं, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह title=

नवी दिल्ली : राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारणार आहेत. १६ वर्षांनंतर काँग्रेसला नवं नेतृत्व लाभत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातारवण आहे. 

दिल्लीतल्या काँग्रेस मुख्यालयामध्ये शुक्रवारपासूनच सणाचं वातावरण आहे. ढोलताशे घेऊन कार्यकर्ते कार्यालयात पोहोचलेत. चांदणी चौकामध्ये मिठाईची ऑर्डर दिली गेलीये.बुंदीचे लाडू, पेढे, बर्फी तयार आहे. काँग्रेसच्या युवराजांना आता राज्याभिषेक होणार असल्यामुळे कार्यकर्ते प्रचंड उत्साहात आहेत.

सोनिया गांधी सक्रिय राहणार

 राहुल गांधींच्या राज्याभिषेकाची तयारी सुरु असताना सोनिया गांधी आता संपूर्ण राजसन्यास घेणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियात पसरल्या होत्या. त्याचं काँग्रेसनं खंडन केलंय. त्या अध्यक्षा म्हणून निवृत्त होत असल्या तरी राजकारणात त्या यापुढंही सक्रीय राहतील, असं काँग्रेसनं स्पष्ट केलंय.

नवे अध्यक्ष राहुल गांधी 

 सोनिया गांधींची अध्यक्षपदाची कारकीर्द उद्या संपुष्टात येत असून, त्यांच्या जागी नवे अध्यक्ष म्हणून राहुल गांधी सूत्रे स्वीकारणार आहेत. यापुढं तुमची भूमिका काय असेल, अशी विचारणा पत्रकारांनी आज संसद भवनात सोनिया गांधींना केली, तेव्हा माझी भूमिका निवृत्त होण्याची आहे, असं त्या म्हणाल्या.

काँग्रेस पक्षाला मार्गदर्शन 

 त्यावरून सोनिया गांधी सार्वजनिक जीवनातून संन्यास घेत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यात. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी हा खुलासा केलाय. यापुढंही त्या काँग्रेस पक्षाला मार्गदर्शन करत राहतील, असं त्यांनी सांगितलं.