मला सर्वश्रेष्ठ व्हायचंय, सल्ल्याची गरज नाही- कोहली

टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन विराट कोहलीला उपरती झालेली आहे. त्यानं आपल्याला आता कोणाच्याही सल्ल्याची गरज नसल्याचं म्हटलंय. टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. लंडनमध्ये बीसीसीआय टीव्हीशी बोलतांना कोहलीनं कोहलीनं सोमवारी स्वत:च्या खेळाचं आणि क्षमतेचं मूल्यमापन केलं.

PTI | Updated: Jul 1, 2014, 02:59 PM IST
मला सर्वश्रेष्ठ व्हायचंय, सल्ल्याची गरज नाही- कोहली title=

लंडन: टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन विराट कोहलीला उपरती झालेली आहे. त्यानं आपल्याला आता कोणाच्याही सल्ल्याची गरज नसल्याचं म्हटलंय. टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. लंडनमध्ये बीसीसीआय टीव्हीशी बोलतांना कोहलीनं कोहलीनं सोमवारी स्वत:च्या खेळाचं आणि क्षमतेचं मूल्यमापन केलं.

वन-डे, टेस्ट आणि ट्वेंटी-२० या तिन्ही क्रिकेट प्रकारांत सरस कामगिरी करणारा विराट सध्या आत्मविश्वासाच्या शिखरावर विराजमान आहे. त्यामुळंच त्याला स्वत:चा खेळ सुधारण्यासाठी कुणाच्याही सल्ल्याची गरज वाटेनासी झाली आहे. त्यानं हे स्पष्टपणे बोलून दाखवलंय.

विराट म्हणाला, 'प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा टप्पा येतो, ज्या टप्प्यावर त्याला स्वत:ला कुणापुढंही सिद्ध करण्याची गरज वाटत नाही. क्रिकेटपटू म्हणून मी तो टप्पा गाठलाय असं मला वाटतं. त्यामुळं आणखी चांगलं खेळण्यासाठी मला कुणाच्याही सल्ल्याची गरज नाही.'  

इंग्लंडच्या दौऱ्यातही चांगलं खेळण्याचा आणि जास्तीत जास्त धावा काढण्याचा माझा प्रयत्न असेल. इंग्लंडमध्ये टेस्ट मॅच खेळणं माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, याची मला जाणीव आहे. ही जाणीव करून देण्यासाठी मला अन्य कुणाची गरज नाही. सगळ्याच देशांमध्ये मला रन्स करायचे आहेत, कारण मला सर्वश्रेष्ठ व्हायचंय. शिवाय इतरांपुढं स्वत:ला सिद्ध करण्याऐवजी मला स्वत:कडून काय हवं आहे आणि माझी कामगिरी कशी सुधारेल याचा विचार करणं मला महत्त्वाचं वाटतं,' असंही कोहली म्हणाला. 

दरम्यान, टीम इंडियाचा ‘द वॉल’ राहुल द्रविडला बीसीसीआयनं टीम इंडियाचा सल्लागार म्हणून नियुक्त केलंय. विराट कोहलीचं हे वक्तव्य म्हणजे द्रविडला टोमणा तर नाही ना...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.