गडकरींना कायदेशीर नोटीस बजावणार - ठाकरे
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी भाजप अध्यक्ष नितीन गडकरींनी केलेले आरोप फेटाळले आहेत. गडकरींनी केलेले आरोप बिनबुडाचे असून त्यांना कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचही माणिकरावांनी सांगितलंय.
Oct 30, 2012, 08:04 PM ISTगडकरींनी केला ठाकरेंवर गंभीर आरोप
गेल्या काही दिवसांपासून गैरव्यवहारप्रकरणी आरोपांमुळं बॅकफूटवर गेलेल्या नितीन गडकरींनी शेवटी आज आपले मौनव्रत सोडत विरोधकांना इशारा दिला. नागपुरात झालेल्या जंगी स्वागतानंतर, त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकरावांवर ऊस उत्पादकांची २३ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप केला. माणिकरावांनी मात्र आरोप फेटाळून लावलेत.
Oct 29, 2012, 10:31 PM ISTगडकरींच्या पाठिशी भाजप - जावडेकर
भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी हे आपल्या पदाचा राजीनामा देतील ही बातमी साफ चुकीची आणि निराधार आहे. गडकरी यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही. भाजप गडकरींच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असं स्पष्टीकरण भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी दिले.
Oct 26, 2012, 11:58 PM IST‘आरएसएसनं वापरला चोरीचा पैसा’
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी भाजप अध्यक्ष नितीन गडकरी आणि आरएसएसवर घणाघाती आरोप केले आहेत. गडकरी सार्वजनिक बांधकाममंत्री असताना नागपुरातल्या आरएएसच्या कार्यालयाचे बांधकाम झाले आहे. त्यामुळं यासाठी आलेला पैसा हा संशयास्पद असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
Oct 25, 2012, 09:38 PM ISTनितीन गडकरी अडचणीत
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या `पूर्ती पॉवर अँड शुगर`मधल्या घोटाळ्यांबद्दल केजरीवाल यांनी आवाज उठवल्यामुळे गडकरी चांगलेच अडचणीत आले आहेत.
Oct 24, 2012, 02:26 PM ISTतर अण्णा हजारेंसारखे हाल होतील - बाळासाहेब
भाजप अध्यक्ष नितीन गडकरींवरील आरोपांप्रकरणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी नितीन गडकरींची पाठराखण केली. सामना या मुखपत्रात त्यांनी ठाकरी शैलीत अरविंद केजरीवाल आणि अंजली दमानिया यांचा समाचार घेतलाय.
Oct 19, 2012, 05:35 PM ISTकेजरीवालांच्या आरोपांवर शिवसेनेची संशयाची फोडणी
भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर याचा ‘बोलविता धनी कोण ?’ याची चर्चा आता सुरु झाली आहे. गडकरींचा वारू रोखण्यासाठी हे षडयंत्र असल्याचा संशय शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलाय.
Oct 18, 2012, 07:09 PM ISTअजितदादांनी केली सुप्रियाताईंना घोटाळ्यात मदत
पुण्याजवळ असलेल्या लवासा लेक सिटीची जमीन लिलाव न करता सुप्रिया सुळे यांच्या कंपनीला कवडीमोल भावाने दिल्याचा आरोप माजी आयपीएस आधिकारी वाय. पी. सिंग यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केला आहे.
Oct 18, 2012, 05:14 PM ISTसिंचन घोटाळ्यात भाजप-काँग्रेसचं साटंलोटं
अरविंद केजरीवाल यांनी आज आणखी एक नवा गौप्यस्फोट केलाय..वडेरा आणि खुर्शिदनंतर त्यांनी आज भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर हल्लाबोल केलाय.
Oct 17, 2012, 07:54 PM ISTचिल्लर आरोपांना महत्व देत नाही- गडकरी
अरविंद केजरीवाल यांनी भाजप अध्यक्ष नितीन गडकरींवर केलेल्या गंभीर आरोपांना नितीन गडकरी यांनी ताबडतोब प्रत्युत्तर दिलं आहे. आपण अशा चिल्लर आरोपांना महत्व देत नाही असं सांगत नितीन गडकरी यांनी आपल्यावरील आरोप झटकायचा प्रयत्न केला आहे.
Oct 17, 2012, 07:51 PM ISTसर्व पक्ष साटंलोटं करून मालामाल होत आहेत का?
अरविंद केजरीवाल यांनी आज आणखी एक नवा गौप्यस्फोट केलाय..वडेरा आणि खुर्शिदनंतर त्यांनी आज भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर हल्लाबोल केलाय.
Oct 17, 2012, 07:44 PM ISTराज-उद्धव एकत्र आल्यास आनंद होईल- गडकरी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे एकत्र आले तर सर्वात जास्त आनंद शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना होईल. मलाही या घटनेचा आनंद होईल, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
Oct 9, 2012, 08:26 PM ISTमाणिकराव आणि गडकरींमध्ये `तू तू- मै मै`
राज्यातल्या सिंचन प्रकल्पांना निधी देण्यासाठी केंद्राशी झालेल्या पत्रव्यवहाराचा वाद बराच रंगलाय. पत्र कोणी पाठवलं, यावरून वाद झडल्यानंतर आता ही पत्रं शेतक-यांच्या भल्यासाठी लिहिली की कंत्राटदारांच्या, यावरून तू-तू, मै-मै सुरू झालंय...
Oct 6, 2012, 08:48 PM ISTगडकरींना पक्षाध्यक्ष पदाची लॉटरी
नागपूरचे नितीन गडकरी यांचा सलग दुसर्यांदा पक्षाध्यक्ष होण्याचा मान भाजपने उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी पक्षाच्या घटनेत दुरूस्तीही करण्यात आली आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा भाजप पक्षाचा अध्यक्ष होण्याचा मान मिळण्याची शक्यता आहे.
Sep 29, 2012, 02:19 PM ISTशरद पवार आणि गडकरींचं साटंलोट?
एका विरोधी पक्षाच्या अध्यक्षाचं शरद पवार य़ांच्याशी साटंलोट असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय.
Sep 27, 2012, 01:20 PM IST