IPL Auction: मुंबईचा पराभव करायला मजा येईल! म्हणणाऱ्या खेळाडूलाच MI ने विकत घेतलं, जुना व्हिडीओ Viral

IPL 2025  Mega Auction :  सीएसके आणि मुंबई हे दोन्ही आयपीएलचे सर्वात यशस्वी संघ असून त्यांनी प्रत्येकी 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.

पुजा पवार | Updated: Nov 27, 2024, 06:06 PM IST
IPL Auction: मुंबईचा पराभव करायला मजा येईल! म्हणणाऱ्या खेळाडूलाच MI ने विकत घेतलं, जुना व्हिडीओ Viral title=
(Photo Credit : Social Media)

IPL 2025 Mega Auction :  चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही आयपीएलचे सर्वात यशस्वी संघ असून त्यांनी प्रत्येकी 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. भारतीय संघाचा स्टार गोलंदाज आणि धोनीचा लाडका दीपक चहर (Deepak Chahar) आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपरकिंग्सच्या पिवळ्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार नाही. आयपीएल ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने त्याला विकत घेतल्यामुळे आता तो चेन्नईची रायवलरी असलेल्या मुंबई इंडियन्सच्या निळ्या जर्सीत मैदानात उतरेल. ऑक्शननंतर (IPL 2025) मागील 7 वर्ष चेन्नई सुपरकिंग्सचा भाग असलेला दिपक चहर यंदा मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसेल. 

मुंबई इंडियन्सने चहरवर उधळला पैसा : 

32 वर्षांच्या दीपक चहरला चेन्नई सुपरकिंग्सने आयपीएल 2025 साठी रिटेन केलं नाही. त्यामुळे 2 कोटींच्या बेस प्राईजवर चहर मैदानात उतरला. मुंबई इंडियन्सने त्याला 9.25 कोटींची बोली लावून खरेदी केले. आता मुंबई सोबत जोडलेल्या दीपक चहरचा जुना व्हिडीओ व्हायरल होत असून त्याने मुंबई इंडियन्सबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. 

दीपक मुंबई इंडियन्सबद्दल असं काय म्हणाला होता? 

दीपक चहर चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळत असताना त्याने आयपीएल सामना झाल्यावर ब्रॉडकास्टर्स सोबत बातचीत केली होती. जेव्हा त्याला विचारण्यात आले की त्याला फायनलमध्ये कोणत्या संघा विरुद्ध खेळायला आवडेल? तेव्हा चहरने मुंबई इंडियन्सचं नाव घेतलं होतं. यानंतर तेथे उभा असलेला चेन्नईचा माजी खेळाडू सुरेश रैनाने त्याला आठवण करून दिली की चेन्नईने सर्वाधिक फायनल मुंबई इंडियन्स विरुद्धच हरल्या आहेत. याला उत्तर देताना दीपक म्हणतो, 'ते बदलायचे आहे, मुंबई इंडियन्सला हरवण्यात मजा येते'. 

हेही वाचा : ICC Ranking : जसप्रीत बुमराह जगात नंबर 1, जयस्वालनेही घेतली गरुड झेप तर कोहलीचाही धमाका

 

पाहा व्हिडीओ  : 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by sujeet Kumar (sujeet2sujit)

दीपक चहरचं आयपीएल करिअर : 

2016 मध्ये पदार्पण केलेल्या दीपक चहरने आयपीएलमध्ये एकूण 81 सामने खेळले आहेत. ज्यात त्याने एकूण 77  विकेट्स घेतले.  आत्तापर्यंत दीपक इंडियन प्रीमियर लीगमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला आहे. यंदा प्रथमच तो मुंबई इंडियन्स विरुद्ध मैदानात उतरेल.