nitin gadkari

राजनाथ सिंह भाजपचे नवे अध्यक्ष

भाजपच्या अध्यक्षपदी राजनाथ सिंह यांची बिनविरोध निवड करण्यात आलीय. बुधवारी दुपारी १२ वाजता या निर्णयाची औपचारिक रित्या घोषणा करण्यात आलीय.

Jan 23, 2013, 12:19 PM IST

राजनाथ सिंह यांच्या नावावर शिक्कामोर्तब

भाजपच्या अध्यक्षपदी राजनाथ सिंह यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. भाजपच्या संसदीय दलाची बैठक झाली, या बैठकीत राजनाथ सिंह यांच्या नावावर एकमत झाल्याचं समजतंय.

Jan 23, 2013, 11:10 AM IST

गडकरींची स्वप्न‘पूर्ती’ धोक्यात!

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या पूर्ती उद्योग समूहातील मुंबईत नोंदणी झालेल्या कंपन्यांची चौकशी प्राप्तिकर खात्यामार्फत करण्यात येत आहे. पूर्ती कंपनीशी संबंधित मुंबईतील नऊ ठिकाणांवर प्राप्तिकर खात्यामार्फत मंगळवारी छापे टाकण्यात आले.

Jan 23, 2013, 09:52 AM IST

गडकरींचा अध्य़क्षपदाचा राजीनामा

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नितीन गडकरी यांनी अध्यक्षपद सोडले असून ते निवडणूक लढणार नसल्याचेही सूत्रांनी सांगितले.

Jan 22, 2013, 10:12 PM IST

नितीन गडकरींचा अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा

भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांचा निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा मिळाला आहे. तर अध्यक्षपदासाठी चर्चेत असलेल्या लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी या स्पर्धेतच नसल्याचे दिलेले स्पष्टीकरण यामुळे मार्गातील अडसर दूर झालाय.

Jan 21, 2013, 12:10 PM IST

भाजपमध्ये निवडणुकीची धूरा कुणाकडे?

एकीकडे काँग्रेसनं राहुल गांधींना उपाध्यक्षपदी बसवून पुढल्या वर्षी लोकसभा निवडणुकीची सूत्रं अप्रत्यक्षरित्या बहाल केली आहेत. त्यामुळे आता प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपमध्ये निवडणुकीची धुरा कोणाकडे असणार, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.

Jan 20, 2013, 07:54 PM IST

गडकरींनी तत्काळ राजीनामा द्यावा - यशवंत सिन्हा

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय पक्षाध्यक्ष नितीन गडकरींनी आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केली आहे.

Nov 20, 2012, 08:01 PM IST

गडकरी सांगा अध्यक्षपद की उद्योग - गुरुमुर्ती

संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि अर्थतज्ञ एस. गुरुमुर्ती यांच्या नव्या मतप्रदर्शनामुळं भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या अडचणीत भर पडली आहे. त्यामुळे गडकरी काय निर्णय घेतात की त्यांच्यावरील शाब्दीक हल्ला परतावून लावणार, याकडे लक्ष लागले आहे.

Nov 14, 2012, 10:53 AM IST

सिद्धू ‘बिग बॉस’मधून बाहेर…

‘बीग बॉस सीझन ६’ मध्ये आपला डेरा जमवून बसलेला सिद्धू मात्र आता या कार्यक्रमातून बाहेर पडणार आहे. पण, सिद्धूला घरातून बाहेर पडण्याचा आदेश बीग बॉसनं दिलेला नाही तर हा आदेश दिलाय भाजपच्या ‘बॉस’नं...

Nov 9, 2012, 02:36 PM IST

नितीन गडकरींना भाजपचा ठाम पाठिंबा

भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर भाजप नितीन गडकरींच्या पाठिशी ठाम राहिला आहे. स्वामी विवेकानंद आणि कुख्यात डॉन दाऊद यांची तुलना केल्याने गडकरींवर जोरदार टीका झाली. याबाबत पक्षातील ज्येष्ठ नेते राम जेठमलानी यांनी राजीनाम्याची मागणी गेली. मात्र, गडकरींवरील सर्व आरोप चुकीचे आहेत, अशी भूमिका घेत भाजपच्या कोअर समितीच्या बैठकीत गडकरींना पाठिंबा देण्याचे शिक्कामोर्तब करण्यात आले.

Nov 7, 2012, 04:10 PM IST

गडकरी राजीनामा द्या – राम जेठमलानी

भाजप नेते राम जेठमलानींनी अपेक्षेप्रमाणे भाजप अध्यक्ष नितीन गडकरींवर तोफ डागलीय़. नितीन गडकरी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जेठमलानी यांनी केलीय.

Nov 6, 2012, 01:12 PM IST

गडकरींच्या वक्तव्यावरून दिग्गीराजांचं मोदींना आव्हान

गडकरींनी स्वामी विवेकानंद आणि दाऊद इब्राहिम यांच्या आयक्यू पातळीबद्दल केलेल्या तुलनेचा सर्व थरांतून निषेध होत आहे. यामध्ये काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंगदेखील मागे नाहीत.

Nov 5, 2012, 05:27 PM IST

विवेकानंद आणि दाऊदचा आयक्यू समान - गडकरी

पूर्ती कंपनीच्या गुंतवणूकदारांवरुन झालेल्या आरोपांचा धुरळा खाली बसतो ना बसतो तोच नितीन ग़डकरी यांच्यावर आणखी एक वाद ओढावलाय. भोपाळमध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्वामी विवेकानंद आणि दाऊद इब्राहिम यांचा आयक्यू समान असल्याचं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलयं.

Nov 5, 2012, 12:26 PM IST

माझी संपत्ती केवळ १२.५ कोटी रुपये- गडकरी

भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी आपल्यावरील सर्व आरोप निराधार असल्याचं नितीन गडकरींनी आज सांगितलं. त्यांच्यावर गैरव्यवहारांचे आरोप झाल्यानंतर पहिल्यांदाच मुंबईत आले आहेत. आपण कुठलंही चुकीचं काम केलं नसल्याचं गडकरींनी आज भाषणात म्हटलं आणि भाजपनेही गडकरींच्या पाठिशी ठाम उभे असल्याचा संदेश दिला.

Oct 31, 2012, 11:59 AM IST

गडकरींच्या `पूर्ती`ची आयकर विभागाकडून चौकशी

मुंबईत १२ ठिकाणी `पूर्ती` कंपनीच्या कार्यालयांमध्ये आयकर विभागाकडून चौकशी करण्यात येतेय. पूर्तीमध्ये गुंतवणूक
करणा-या कंपन्यांचाही तपास केला जातोय. तसंच कंपन्यांच्या नव्या - जुन्या पत्यांचीही तपासणी केली जातेय.

Oct 30, 2012, 10:47 PM IST