गडकरींनी केला ठाकरेंवर गंभीर आरोप

गेल्या काही दिवसांपासून गैरव्यवहारप्रकरणी आरोपांमुळं बॅकफूटवर गेलेल्या नितीन गडकरींनी शेवटी आज आपले मौनव्रत सोडत विरोधकांना इशारा दिला. नागपुरात झालेल्या जंगी स्वागतानंतर, त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकरावांवर ऊस उत्पादकांची २३ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप केला. माणिकरावांनी मात्र आरोप फेटाळून लावलेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 29, 2012, 10:31 PM IST

www.24taas.com,नागपूर

गेल्या काही दिवसांपासून गैरव्यवहारप्रकरणी आरोपांमुळं बॅकफूटवर गेलेल्या नितीन गडकरींनी शेवटी आज आपले मौनव्रत सोडत विरोधकांना इशारा दिला. नागपुरात झालेल्या जंगी स्वागतानंतर, त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकरावांवर ऊस उत्पादकांची २३ लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप केला. माणिकरावांनी मात्र आरोप फेटाळून लावलेत.

गेल्या काही दिवसांपासून अडचणीत आलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरींच्या पाठिशी पक्ष ठामपणे उभा राहिल्यानंतर त्यांच्या होम ग्राऊंडवर म्हणजेच नागपुरात त्यांचं असं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यानंतर गडकरींनी आरोप करणा-यांना जशास तसे उत्तर देऊ अशी गर्जना केली.
तसंच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंवर यवतमाळ जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतक-यांचे 23 लाख रुपये बुडवल्याचा आरोप घणाघाती आरोप केला. माणिकरावांच्या कारखान्याला दिलेल्या ऊसाची देयके संबंधित शेतक-यांना दिली नसल्याचा आरोप गडकरींनी केला. माणिकराव ठाकरेंनी मात्र गडकरींनी केलेले आरोप फेटाळून लावलेत.
पूर्ती समूहानं कुठलाही गैरव्यवहार केला नसल्याचा दावा करत आपण कुणालाही घाबरत नसून या सर्व प्रश्नांवर जनतेच्या न्यायालयात जाण्यासही तयार असल्याचं ते म्हणाले. पक्ष आणि संघही भक्कमपणे पाठिशी उभे राहिल्यानं आणि अध्यक्षपदाच्या दुस-या टर्मवरचे संकटही टळल्यानं नितीन गडकरी आता मैदानात उतरून विरोधकांशी दोन हात करण्यास सज्ज झालेत. त्याचीच झलक नागपुरात पाहायला मिळाली.
काँग्रेसवर हल्लाबोल करत त्यांनी केलेलं जोरदार शक्तीप्रदर्शन पक्षांतर्गत विरोधकांनाही इशारा देण्यासाठीच होतं. असं बोलंलं जातंय.