‘राणेपुत्रा’ची रातोरात जामिनावर सुटका
उद्योगमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांची जामिनावर सुटका झालीय. दहा हजार रुपयांच्या जामिनावर त्यांची सुटका करण्यात आलीय. त्यांच्यासह इतर चौघांचीही जामिनावर सुटका झालीय.
Dec 4, 2013, 07:56 AM ISTराणे पुत्राची गुंडगिरी, नितेश राणेंसह कार्यकर्त्यांना गोव्यात अटक
उद्योगमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांना गोव्यात टोल नाक्यावर तोडफोड केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
Dec 3, 2013, 08:09 PM IST`दादा`गिरी करणाऱ्यांचे हात मुळासकट उखडून टाकू - उद्धव ठाकरे
माझ्या शिवसैनिकांच्या वाट्याला जाऊ नको. याचा चांगला परिणाम होणार नाही. येथे काँग्रेसची दादागिरी चालणार नाही. उगारणारा हात मुळासकट उखडून टाकू, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्योग मंत्री नारायण राणे यांना दिला.
Nov 27, 2013, 08:17 AM IST... आधी साहेबांचं स्मारक बांधून दाखवा; राणेंचं प्रत्यूत्तर
सिंधुदुर्गातल्या राड्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांनी एकमेकांना आव्हान - प्रतिआव्हान दिलंय.
Nov 26, 2013, 06:16 PM ISTपोलिसांनी सुपारी घेऊन केला शिवसैनिकांवर हल्ला - उद्धव
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. इथं दाखल झाल्यानंतर त्यांनी कणकवलीत शिवसैनिकांशी संवाद साधला.
Nov 26, 2013, 03:37 PM ISTनारायण राणेंची शिवसेनेवर जोरदार टीका
काँग्रेसचे नेते आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज रत्नागिरीत बोलताना शिवसेनेवर जोरदार टीका केली. रत्नागिरी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त करू, असे जाहीर आव्हान राणे यांनी दिले.
Nov 22, 2013, 05:28 PM ISTराणे-भुजबळ यांना शिवसेनेत येण्याचे आठवलेंचे निमंत्रण
शिवसेनचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्यामुळे आपल्याला शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याची वेळ आली, असे ज्या नेत्यांना वाटते अशा नेत्यांनी आता पुन्हा शिवसेनेत यावे, असा उपरोधिक टोला आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी लगावला आहे.
Oct 17, 2013, 01:37 PM ISTअपमान सहन करणं जोशींचा जन्मसिद्ध हक्क- राणेंचं टीकास्त्र
शिवसेनेतल्या मनोहर जोशी मानापमान नाट्यावर कधीकाळी शिवसैनिक असलेले उद्योगमंत्री नारायण राणे यांनी जोरदार प्रहार केलाय. “पदांसाठी अपमान सहन करत राहणं हा जोशींचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो ते सहन करत राहणारच, असा वार राणेंनी जोशींवर केला.”
Oct 15, 2013, 07:39 PM ISTमनोहर जोशींवर राणेंचा प्रहार, भुजबळांनीही केलं लक्ष्य!
“अपमान सहन करत राहणं हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि अपमान करून घेत पदं मिळवत राहणं हे मनोहर जोशींचं ब्रिद आहे”, अशा शब्दांत नारायण राणेंनी टीकास्त्र सोडलंय. बाळासाहेबांनी जोशींवर प्रत्येक वेळी विश्वास टाकला आणि त्यांनी मात्र कायम विश्वासघात केला, असं राणे म्हणाले.
Oct 15, 2013, 07:15 PM ISTचिंटू शेखची राणेंविरोधातली याचिका बिनशर्त मागे
चिंटू शेख गोळीबार प्रकरणाला नाट्यमय कलाटणी मिळालीय. नारायण राणे तसंच प्रहार वर्तमानपत्राविरोधात केलेली अब्रु नुकसानीची याचिका शमीम उर्फ चिंटू शेख यानं मागे घेतलीय.
Sep 26, 2013, 02:48 PM ISTनारायण राणेंनाही `एमसीए` अध्यक्षपदाचे वेध!
‘एमसीए’ निवडणुकीसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांसह अनेक नेते इच्छुक असताना आता उद्योगमंत्री नारायण राणेही या स्पर्धेत उतरण्याची शक्यता निर्माण झालीय.
Sep 20, 2013, 07:29 PM ISTउद्योगमंत्री राणेंविरोधात गावकऱ्यांबरोबर विरोधकही मैदानात
रत्नागिरीतल्या जैतापूर प्रकल्पाच्या संघर्षाची धार कमी होते न होते तोच आता आता कोकणात सी वर्ल्ड प्रकल्पावरून नवा वाद निर्माण झाला आहे. उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याविरोधात आता गावकरी एकत्र आले आहेत.
Sep 18, 2013, 11:16 AM IST‘साखरे’वरुन कडवटपणा, राणे-सावंत यांच्यात जुंपली!
उद्योगमंत्री नारायण राणे आणि काँग्रेसचेच आमदार विजय सावंत यांच्यातील साखर कारखाना उभारणीवरून निर्माण झालेला वाद शिगेला पोहोचलाय.
Sep 16, 2013, 11:31 AM ISTजैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचा विरोध मावळला
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचा असलेला विरोध कमी करण्यात उद्योगमंत्री नारायण राणे यांना यश आलंय. प्रकल्पाचा विरोध करणाऱ्या जनहीत सेवा समितीमध्ये फूट पडलीय.
Aug 31, 2013, 09:41 AM ISTराज ठाकरे नाशिकमध्ये काय केलं - राणे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर उद्योगमंत्री नारायण राणे यांनी ‘प्रहार’ केलाय. राज ठाकरे नाशिकमध्ये काय केलं, असा सवाल राणे यांनी विचारला आहे.
Aug 22, 2013, 04:54 PM IST