राणेंनी उचलली जीभ लावली टाळ्याला- भाजप
भाजप आमदार आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यात आज विधान परिषदेत खडाजंगी झाली. भाजप आमदारांनी स्वस्तात सरकारी जमिनी घेतल्याचा आऱोप उद्योगमंत्री नारायण राणे यांनी विधान परिषदेत केला.
Apr 9, 2012, 07:13 PM ISTनारायण राणेंचा अजितदादांवर हल्लाबोल
पुण्यातल्या प्रचार सभेत नारायण राणेंनी अजितदादांवर हल्लाबोल केला. सर्वात जास्त गुन्हेगार राष्ट्रवादीचे आहेत. कलमाडींना नावं ठेवता, तुम्ही पुण्याचे काय नाव उज्ज्वल केले असा सवाल राणेंनी केला.
Feb 13, 2012, 02:45 PM ISTनितेश राणेंचा अजितदादांना इशारा
द्योगमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आणि 'स्वाभिमान' संघटनेचे नेते नितेश राणे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवारांना आव्हान दिलं आहे. अजित पवारांनी राजकीय संन्यास घेण्यास तयार राहावे असा इशारा नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्र्यांना दिला आहे.
Feb 4, 2012, 05:25 PM ISTराणेंचे वस्त्रहरण आणि घडामोडी...
नारायण राणे यांच्या कुडाळच्या वस्त्रहरण सभेनंतर राणे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये महाभारत रंगलंय. राणेंनी अजित पवार आणि गृहमंत्र्यांना टार्गेट केल्यानंतर, आता राष्ट्रवादीकडून पलटवार होऊ लागले आहेत. दोन्ही बाजूंकडून वैयक्तिक आरोप प्रत्यारोप हो लागल्यानं, ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा वाद रंगण्याची चिन्ह आहेत.
Feb 2, 2012, 08:45 AM ISTराष्ट्रवादीचा राणेंवर 'हल्लाबोल'
कोकणात नारायण राणेंनी काल राष्ट्रवादीच्या नेत्यांचे जाहीर वस्त्रहरण केल्यानंतर बिथरलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राणेंवर आज एकमुखी हल्ला चढवला. सर्वांवरच राणेंनी टीकेचे प्रहार केल्यानं राष्ट्रवादीनं आज राणेंवर हल्लाबोल केला.
Feb 1, 2012, 08:28 PM ISTअजित पवारांचा नारायण राणेंवर पलटवार
उद्योगमंत्री नारायण राणेंच्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे ते अहमदनगर इथे बोलत होते. नारायण राणेंचे मानसिक संतूलन बिघाडल्याने ते असे बोलतात अशी घणाघाती टीका अजित पवारांनी केली.
Feb 1, 2012, 04:08 PM ISTराणे आज करणार राष्ट्रवादीचे वस्त्रहरण
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी यांच्यात पुन्हा धुमशान होणार आहे. उद्योगमंत्री नारायण राणे यांनी थेट राष्ट्रवादीच्या नेत्यांचं वस्त्रहरण करण्याचा इशारा दिलाय. त्यामुळं या दोन पक्षातला संघर्ष पुन्हा झडणार आहे.
Jan 31, 2012, 08:23 AM ISTवस्त्रहरणापूर्वी राणेंना दणका, कांबळींचे NCPकडून ‘हरण’
कोकणात नारायण राणे विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष शिगेला पोहचला आहे. राणेंनी उद्या कुडाळमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांचं वस्त्रहरण करण्याचं जाहीर केलं असताना त्याआधीच त्यांचे कट्टर समर्थक माजी आमदार शंकर कांबळी यांना फोडून राष्ट्रवादीनं राणेंना आणखी एक दणका दिला आहे.
Jan 30, 2012, 11:12 PM ISTराणेंच्या बालेकिल्ल्यात अजितदादांचे शक्तीप्रदर्शन
नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. माजी आमदार पुष्पसेन सावंत यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अजितदादा पवार कोकणच्या दौऱ्यावर आले.
Jan 23, 2012, 11:56 AM ISTराणेंचा लागणार झेडपीत कस….
सिंधुदुर्गात आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा फड रंगू लागलाय.... जिल्ह्यातले सर्वशक्तीमान नेते नारायण राणेंविरोधात सर्वपक्ष असंच यावेळच्या लढ्याचं स्वरुप असेल.....
Jan 16, 2012, 08:02 PM ISTमालवणमध्ये होणार काँग्रेसचाच नगराध्यक्ष
प्रतिष्ठेची केलेल्या मालवण नगरपरिषदेवर उद्योग मंत्री नारायण राणे यांचे वर्चस्व दिसून येणार आहे. मालवणमध्ये काँग्रेसचाच नगराध्यक्ष होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Dec 23, 2011, 08:16 AM ISTनिवडणुकीची धुमशान
राज्यात नगरपालिका निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि विरोधकांनी मरगळ झटकली. कारण वाढती महागाई, अण्णा फॅक्टर यामुळे कॉंग्रेस आघाडी बॅकफूटवर जाणार अस वाटत होतं. पण आता निवडणूक निकालानंतर वेगळं चित्र समोर आलं.
Dec 15, 2011, 11:24 AM ISTकोकणातील लोक दादागिरीला कंटाळले – राज
कोकणातील लोक दादागिरीला कंटाळले आहेत. त्यांना दहशत नकोय, तसेच कोकणात काम होत नाही, असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज उद्योग मंत्री नारायण राणे आणि राष्ट्रवादीचे मंत्री भास्कर जाधव यांना लगावला आहे.
Dec 13, 2011, 04:52 PM ISTनारायण राणेंचा विरोधक आणि मीडियावर घणाघात
नारायण राणेंनी नगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत विरोधक आणि मीडियाचा चांगलाच समाचार घेतला. मला बातम्यांमध्ये दिलेल्या प्राधान्यक्रमाबद्दल मी आभारी असल्याचं सांगत राणेंनी मीडियावर हल्ला चढवला.
Dec 13, 2011, 12:35 PM ISTनारायणराव जरा दमानं – राज ठाकरे
राजकारणात माणसाने कमी बोलायला हवे, नारायण राणेही कमी बोलायला हवे, नाहक वाद ओढवून घेऊ नये, पेशन्स नसतील तर पराभवाचे तोंड पाहावे लागते, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्योग मंत्री नारायण राणे यांना दिला आहे.
Dec 12, 2011, 10:41 AM IST