पुणे विद्यापीठात रखवालदाराचा खून

पुणे विद्यापीठात रखवालदाराचा खून झाल्याची घटना घडलीय. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली आहे.

Updated: May 4, 2012, 12:22 PM IST

www.24taas.com, पुणे

 

पुणे विद्यापीठात रखवालदाराचा खून झाल्याची घटना घडलीय. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली आहे.

 

प्रल्हाद लक्ष्मण जोगदनकर याच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीय. विद्यापीठ परिसरातल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामागं झाडीमध्ये ही हत्या करण्यात आली. त्या ठिकाणी बसलेल्या प्रेमीयुगलाकडून पैसे मागितल्याच्या कारणावरुन ही हत्या करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

 

विद्यापीठ परिसरातल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामागं झाडीमध्ये प्रल्हाद जोगदनकर  याची हत्या करण्यात आली. त्या ठिकाणी बसलेल्या प्रेमीयुगुलाकडून पैसे मागितल्याच्या कारणावरुन ही हत्या करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. जोगदनकर सोबत आणखी एक सुरक्षारक्षक त्यावेळी हजर होता. पण पैशांवरून या दोघांचा त्या प्रेमीयुगुलाशी वाद झाला आणि त्या मुलानं जोगदनकरवर दोन राऊंड फायर केले. त्यावेळी दुसरा सुरक्षारक्षक तिथून फरार झाला. त्यानंतर काहीवेळानं सुरक्षारक्षक परतला.