अभिनेत्री लैला खानचा झाला खून?

गेल्या एक वर्षांपासून गूढरित्या गायब झालेल्या पाकिस्तानी अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबीयांची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं लैलाच्या एक नातेवाईकासह दोघांना अटक केली आहे.

Updated: Jul 5, 2012, 11:15 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

गेल्या एक वर्षांपासून गूढरित्या गायब झालेल्या पाकिस्तानी अभिनेत्री लैला खान आणि तिच्या कुटुंबीयांची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं लैलाच्या एक नातेवाईकासह दोघांना अटक केली आहे.

असिफ शेख असं त्याचं नाव आहे. तर साथीदाराचं नाव परवेझ आहे. त्याला काश्मीरमधून अटक केली आहे. आसिफ लैलाच्या आईचा नातेवाईक असल्याचं सांगण्यात येत आहे. संपत्तीच्या वादातून त्यानं लैला खान आणि तिची आई आणि बहिणीचा खून केला आहे.

मुंबईजवळच्या जंगलात तिची हत्या करुन मृतदेह गाडल्याचा संशय आहे. लैला तिच्या इगतपुरीच्या बंगल्यातून गायब झाली होती. शिवाय तिची कार काश्मीरमध्ये सापडली आहे. लैला खान हीचा संबंध दाऊदशी जोडण्यात येत होता..