डॉ. दाभोळकरांच्या हत्येचा सुगावा - गृहमंत्री

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी थोड्या प्रमाणात का होईना पण सुगावा लागलाय, असा दावा केंद्रिय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 2, 2013, 08:22 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी थोड्या प्रमाणात का होईना पण सुगावा लागलाय, असा दावा केंद्रिय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलाय.
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला आता १०० दिवस पूर्ण होऊन गेलेत. परंतु, त्यांच्या हत्येचा अजूनही मागमूस लागला नसल्यानं जनतेत त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जातेय. यासंबंधी बोलताना केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या प्रकरणाचे धागेदोरे हाती लागल्याचं, म्हटलंय. तीन दिवसांपूर्वी आपल्याला दाभोळकरांचं कुटुंबीय भेटल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यानंतर राज्य सरकारशी केलेल्या चर्चेनंतर या प्रकरणी सुगावा लागल्याची माहिती मिळाल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पत्रकारिता आणि राजकारणातील योगदान मोठे असल्याने त्यांचे स्मारक झाले पाहिजे, असेही ते म्हणाले.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.