गोव्यात ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी रेकॉर्डब्रेक गर्दी
गोव्यात ३१ डिसेंबरच्या सेलीब्रेशनसाठी रेकॉर्डब्रेक गर्दी उसळलीये. किनारपट्टी भागात तर वाहनांच्या दहा-दहा किलोमीटरच्या रांगा लागल्यात. सेलीब्रेशन दरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी गोवा पोलिस सज्ज आहेत.
Dec 31, 2013, 07:43 AM ISTअक्षय कुमार, सोनम कपूर गोव्यात करणार नववर्ष सेलिब्रेशन
थर्टी फस्ट साजरे करण्यासाठी आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी गोव्यात बॉलिवूडमंडळी अवतरणार आहेत. नववर्ष सेलिब्रेशन करण्यासाठी बॉलिवूड स्टारमंडळींनी प्राधान्य दिलेय. तसेच अन्य सेलिब्रिटींनीही गोव्याला पहिली पसंती दिली आहे. आघाडीचा अभिनेता अक्षय कुमार आणि सोनम कपूर गोव्यात करणार आहेत एन्जॉय.
Dec 27, 2013, 10:28 AM IST‘ख्रिसमस’ धूम... पर्यटकांच्या खिशाला मात्र फटका
`ख्रिसमस आता अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलाय. त्यामुळं उत्साह आणि आनंद घेऊन येणारा हा सण साजरा करण्यासाठी सारे सज्ज झालेत.
Dec 24, 2013, 05:56 PM ISTकोकण रेल्वे मार्गावर नाताळ, नववर्षासाठी विशेष गाड्या
नाताळ आणि नववर्षासाठी कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतलाय. तसेच जनशताब्दी एक्सप्रेसला जादा डबे जोडण्यात येणार आहेत, अशी माहिती कोकण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांनी दिली.
Dec 21, 2013, 09:42 PM ISTकोकण रेल्वे मार्गावर आता शताब्दी एक्स्प्रेस
कोकण रेल्वे मार्गावर नाताळच्या सुट्टीदरम्यान संपूर्ण वातानुकुलित (AC) शताब्दी एक्स्प्रेस धावणार आहे. वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
Dec 13, 2013, 01:38 PM ISTडॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी गोव्यातून दोघे ताब्यात
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलंय. शुक्रवारी दुपारी 2 वाजता गोव्यातून दोघांना ताब्यात घेण्यात आलंय. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने या दोघांना ताब्यात केलीय..
Dec 7, 2013, 09:55 AM ISTनितेशला वाचविण्यासाठी `बाबा`नं फिरवला डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना फोन
टोल नाक्यावर दादागिरी करून टोल कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या नितेश राणेंना पोलिसांनी अटक केल्यानंतर, नितेशला तिथून बाहेर काढण्यासाठी त्याच्या वडिलांनी म्हणजेच उद्योगमंत्री नारायण राणे यांनी थेट गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला होता.
Dec 5, 2013, 10:46 AM IST`राणे` समर्थक गुंडांनी मुंबईत केली गाड्यांची तोडफोड?
मुंबईत मंगळवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी धु़डगूस घातला. मुंबईहून गोवा आणि पुण्याकडे जाणाऱ्या बसेस या व्यक्तींनी टार्गेट करत तोडफोड केली. ही तोडफोड ‘राणे’ समर्थक गुंडांनी केली असल्याचं इथल्या प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.
Dec 4, 2013, 11:01 AM IST‘राणेपुत्रा’ची रातोरात जामिनावर सुटका
उद्योगमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांची जामिनावर सुटका झालीय. दहा हजार रुपयांच्या जामिनावर त्यांची सुटका करण्यात आलीय. त्यांच्यासह इतर चौघांचीही जामिनावर सुटका झालीय.
Dec 4, 2013, 07:56 AM ISTराणे पुत्राची गुंडगिरी, नितेश राणेंसह कार्यकर्त्यांना गोव्यात अटक
उद्योगमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांना गोव्यात टोल नाक्यावर तोडफोड केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
Dec 3, 2013, 08:09 PM ISTअखेर तरुण तेजपाल तुरुंगात, गोवा पोलिसांनी केली अटक
तहलकाचे संपादक तरुण तेजपाल याला अखेर अटक झाली आहे. लैंगिक शोषणप्रकरणात तेजपालचा अटकपूर्व जामीन अर्ज, गोवा कोर्टानं फेटाळलाय. तेजपालला कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. गोवा पोलीस तेजपालसाठी १४ दिवासांची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे.
Nov 30, 2013, 10:31 PM ISTतेजपालचा ४.३० वाजता फैसला, जेल की बेल?
आपल्याच कार्यालयातील एका महिला पत्रकाराचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेले तहलकाचे संस्थापक तरूण तेजपाल याच्यावर पणजी सत्र न्यायालयाबाहेर हल्ल्याचा प्रयत्न झाला. लैंगिक अत्याचार प्रकरणी दोन्ही पक्षांचा युक्तीवाद संपाला आहे. साडेचारनंतर कोर्टाची अटकपूर्व जामिनावर सुनावणी होणार आहे.
Nov 30, 2013, 02:37 PM ISTकॅन्सरग्रस्त मुलांना कोकण रेल्वेने घडविले गोवा दर्शन
आपल्या आजारातून बाहेर पडण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात नवी उमेद-भरारी आणण्यासाठी कोकण रेल्वेने कॅन्सरने ग्रस्त असलेल्या मुलांला गोवा दर्शन घडविले आहे. टाटा हॉस्पिटलमध्ये ही मुलं सध्या उपचार घेत आहेत.
Nov 30, 2013, 10:25 AM ISTतरुण तेजपालांची अटक उद्यापर्यंत टळली
सहकारी तरुणीवरील लैंगिक शोषण प्रकरणी तहलकाचे तरुण तेजपाल यांना तात्पुरता दिलासा मिळालाय. तेजपाल यांच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी होणार आहे. तोपर्यंत तेजपाल यांची अटक टळलीय.
Nov 29, 2013, 08:36 PM ISTतेजपाल यांचे सीसीटीव्ही फुटेज हस्तगत, शोमा चौधरी यांचा राजीनामा
तहलका मासिकाचे संपादक तरुण तेजपाल लैंगिक शोषण प्रकरणी तहलकाच्या व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर आज दुपारपर्यंत हजर होण्याचे समन्स गोवा पोलिसांनी तेजपाल यांना बजावले आहेत. दरम्यान, गोवा पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेच हस्तगत करण्यात आले आहेत. यामध्ये तेजपाल तरूणीसोबत दिसत आहेत. त्यामुळे तेजपाल यांच्या सुटकेची शक्यता कमी आहे.
Nov 28, 2013, 12:29 PM IST