www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईत मंगळवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी धु़डगूस घातला. मुंबईहून गोवा आणि पुण्याकडे जाणाऱ्या बसेस या व्यक्तींनी टार्गेट करत तोडफोड केली. ही तोडफोड ‘राणे’ समर्थक गुंडांनी केली असल्याचं इथल्या प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.
मुंबईतल्या बोरीवलीमध्ये खासगी ट्रॅव्हल्सच्या बसेसचीही तोडफोड करण्यात आली तर दुसरीकडे काही व्यक्तींनी जुहू इथल्या गोवा भवनला ही लक्ष्य केलं. प्रत्यक्षदर्शींच्या मते तोडफोड करणाऱ्या व्यक्ती हातात एका राजकीय पक्षाचे झेंडे हाती घेऊन आले होते. ही तोडफोड नेमकी कुणी केली? याचा पोलीस अजून तपास करत आहेत त्यामुळे त्यांनी कोणत्याही पक्षाचं सरळ सरळ नाव घेणं टाळलंय. मात्र, या घटनेचा संबंध मंगळवारी नितेश राणे यांना गोव्यात झालेल्या अटकेशी जोडला जातोय.
टोल देण्यास नितेश राणेंनी नकार दिल्यानंतर गोव्यात राडा झाला होता. नितेश यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते सिंधुदुर्गतून गोव्यात जात होते. त्यांना रस्त्यात कलंगूट टोलनाक्यावर टोलसाठी अडवले. मात्र, आपण नारायण राणेंचे पुत्र आहोत, अशी धमकीवजा सुचना त्यांनी टोल कर्मचाऱ्यांना दिली. पण, गाडी सरकारी नसल्यामुळं त्यांना टोल कर्मचाऱ्यांनी गाडी सोडण्यास नकार दिला. त्यामुळं संतापलेल्या नितेशच्या बॉडी गार्ड्सनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती... तसंच टोल नाक्याचीही तोडफोड केली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.