गोव्यात ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी रेकॉर्डब्रेक गर्दी

गोव्यात ३१ डिसेंबरच्या सेलीब्रेशनसाठी रेकॉर्डब्रेक गर्दी उसळलीये. किनारपट्टी भागात तर वाहनांच्या दहा-दहा किलोमीटरच्या रांगा लागल्यात. सेलीब्रेशन दरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी गोवा पोलिस सज्ज आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 31, 2013, 08:04 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, पणजी
गोव्यात ३१ डिसेंबरच्या सेलीब्रेशनसाठी रेकॉर्डब्रेक गर्दी उसळलीये. किनारपट्टी भागात तर वाहनांच्या दहा-दहा किलोमीटरच्या रांगा लागल्यात. सेलीब्रेशन दरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी गोवा पोलिस सज्ज आहेत.
किना-यांची रंगत, पार्ट्यांचा जल्लोष, सेलीब्रेशनचा मनसोक्त फिल देणारा गोवा आता सेलीब्रेशन डेस्टीनेशनही झालाय. म्हणुनच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात गर्दी उसळलीये. सप्ततारांकीत हॉटेलपासून ते गल्लीबोळातल्या छोट्या रिसॉर्टपर्यंतची सर्व हॉटेल फुल्ल झालीयेत.
किना-यांवर पर्यटकांचा महापूर अनुभवायला मिळतोय. देशविदेशातल्या सेलीब्रेटींपासून ते सामान्यांपर्यंत सर्वांचीच पहिली पसंती गोव्यातल्या किना-यांना आहे. त्यामुळे गोव्यात वाहतुकीवरही चांगलाच ताण आलाय. किनारपट्टी भागात तर वाहनांच्या दहा-दहा किलोमीटरच्या रांगा लागल्यात. या काळात सुरक्षेसाठी गोवा पोलिसांनी विशेष बंदोबस्त केलाय.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल व्यावसायिकांनीही विशेष नियोजन केलंय. अतिथी देवो भव म्हणणारी गोवानगरी यंदाही आपलं वेगळपण जपत पर्यटकांना खूश करण्यासाठी प्रयत्नशिल आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.