goa

चला गोव्याला जाऊय़ा...

वाढता उकाडा त्यातच जोडून आलेल्या सुट्ट्यांची संधी साधत देशभरातले लाखो पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत. त्यामुळं यंदाच्या हंगामात पर्यटकांची उच्चांकी संख्या झाली आहे.

Apr 29, 2012, 05:53 PM IST

गोव्यात खाण घोटाळा प्रकरणी कारवाई सुरू

गोव्याच्या खाण उद्योगातील भ्रष्टाचार बाहेर आल्यानंतर आता कारवाईचं सत्र सुरू झालं आहे. न्यायमूर्ती शहा आयोगाकडून या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. हा अहवाल येण्यापूर्वीच गोवा सरकारनं खाण विभागाला दणका देत संचालक अरविंद लोलयेकर यांना निलंबित केलं आहे.

Apr 4, 2012, 08:08 AM IST

गोव्यात पारंपरिक शिमगोत्सव

गोव्याच्या पारंपरिक शिमगोत्सवाला सुरूवात झाली आहे. या शिमगोत्सवाला आजपासून सुरूवात झाली. या उत्सवाची सुरूवात रंगांची बरसात करत होते. गोव्याचे भावी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरही या उत्सवात सहभागी झाले.

Mar 8, 2012, 03:04 PM IST

गोव्यात काँग्रेसच्या राज्यात भाजप

मागील निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा धुव्वा उडवत आपल्याकडे सत्ता खेचून आणली. हाच कित्ता आता भाजपने गिरवल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री दिंगबर कामत यांना पुन्हा सत्तेत बसण्यापासून भाजपने रोखण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात सन्नाटा पसरला आहे.

Mar 6, 2012, 11:10 AM IST

पाच राज्य़ांच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू

देशातील उत्तर प्रदेशसहित उत्तराखंड, पंजाब, मणीपूर आणि गोवा या पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू झाली आहे. गोवा राज्यात भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी एका जागेवर आघाडी मिळाली आहे. तर युतीत सपा ४ जागांवर पुढे आहे.

Mar 6, 2012, 08:19 AM IST

गोव्यात विक्रमी मतदान

गोवा विधानसभेच्या ४० जागांसाठी विक्रमी मतदान झालंय. सुमारे ८० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळापासून बहुतांश मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

Mar 4, 2012, 04:43 PM IST

गोव्यात ४० तर युपीत ६० जागांसाठी मतदान

गोवा आणि उत्तर प्रदेशातील शेवटच्या सातव्या टप्प्यातील मतदानाला आज शनिवारी सकाळी सातवाजल्यापासून सुरुवात झाली. गोव्यात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दोन तासात २० टक्के मतदान झाले आहे. गोव्यात ४० तर उत्तर प्रदेशात ६० जागांसाठी मतदान होत आहे.

Mar 3, 2012, 10:40 AM IST

गोव्यात विधानसभेसाठी उद्या मतदान

गोवा विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार संपला असून ३ मार्चला मतदान होणार आहे. ४० जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रथमच ममता बॅनर्जींच्या तृणमूलने उडी घेतली आहे. त्यामुळे गोव्याकडे लक्ष लागले आहे.

Mar 2, 2012, 11:28 AM IST

गोव्यात बस नदीत कोसळली, तीन ठार

गोव्यातील अल्डोना येथील नदीत विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस कोसळली. या अपघात तीन जणांना जीव गमवावा लागला आहे. बसमध्ये १५ विद्यार्थ्यांसह शिक्षक होते. दोन विद्यार्थी आणि एक शिक्षका अपघातात ठार झाली. हा अपघात आज शनिवारी झाला.

Feb 18, 2012, 04:52 PM IST

'काँग्रेसची घराणेशाही' गोव्यातही

गोव्यात सात वर्ष सत्तेत राहिलेल्या काँग्रेसच्या मंत्री आणि आमदारांनी विधानसभेसाठी त्यांच्याच कुटुंबीयांना उमेदवारी वाटून घेतली आहे. आणि हा मुद्दा लावून धरत विरोधी पक्षाने रान उठवल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे.

Feb 15, 2012, 04:31 PM IST

काँग्रेसची नाती, भाजपला मुद्दे !

गोव्यात सात वर्ष सत्तेत राहिलेल्या काँग्रेसच्या मंत्री आणि आमदारांनी विधानसभेसाठी त्यांच्याच कुटुंबियांना उमेदवारी वाटून घेतली आहे आणि हा मुद्दा लावून धरत विरोधी पक्षाने रान उठवल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे.

Feb 15, 2012, 04:07 PM IST

'सतरंगी रे'... गोव्यात सुरू असा..

आदिनाथ, भूषण, सिद्धार्थ, निखील ही यंग ब्रिगेड आपल्याला दिसणारे 'सतरंगी रे' या अपकमिंग मराठी सिनेमात. ही युथ गॅँग जेव्हा गोव्यात शूटिंग करत होती तेव्हा काय धमाल आली.

Jan 18, 2012, 09:24 PM IST

गोयात रंगतली गझलेची सांज..

गझल प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी. गझल सागर प्रतिष्टान आणि गोवा कला अकादमी यांच्या वतीने गोव्यात १४ आणि १५ जानेवारीला सहावे मराठी गझल संमेलन रंगणार आहे. ज्येष्ठ गझलकार घनश्याम धेंडे हे या संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार आहे.

Jan 3, 2012, 03:41 PM IST

गोव्यात सनबर्न पार्टीची धूम

गोव्यातल्या जगप्रसिद्ध सनबर्न पार्टीला कांदोळी बीचवर सुरुवात झालीय. आशियातल्या या सर्वात मोठ्या समजल्या जाणा-या सनबर्न पार्टीला, तरुणाईची झुंबड उडालीय.

Dec 30, 2011, 09:43 AM IST