www.24taas.com, झी मीडिया, गोवा
तहलका मासिकाचे संपादक तरुण तेजपाल लैंगिक शोषण प्रकरणी तहलकाच्या व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर आज दुपारपर्यंत हजर होण्याचे समन्स गोवा पोलिसांनी तेजपाल यांना बजावले आहेत.
दरम्यान, गोवा पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करण्यात आले आहेत. यामध्ये तेजपाल तरूणीसोबत दिसत आहेत. त्यामुळे तेजपाल यांच्या सुटकेची शक्यता कमी आहे.
गोवा पोलिसांनी म्हटले आहे, पिडीत तरूणी आणि तेजपाल एकत्र लिफ्टमध्ये दिसले आहेत. तेजपाल यांनी तरूणीच्या खांद्यावर हात टाकले आहेत. लिफ्टमध्ये काहीतरी गडबड झाली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. दरम्यान, लिफ्टमधील तेजपाल यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. यामध्ये त्यांचे कृत्य कैद झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे तेजपाल यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
तहलका’ सेक्स स्कँडल प्रकरणात स्वत:ला शोधपत्रकार म्हणवून घेणाऱ्या तरुण तेजपाल याला हायकोर्टाकडून अद्याप दिलासा मिळालेला नाही. २९ नोव्हेंबर रोजी तेजपालच्या अटकपूर्व जामिनावर निर्णय देणार आहे. परंतु, या दरम्यान तेजपालला अटक करण्यापासून पोलिसांना मात्र कोर्टानं मनाई केलेली नाही. तेजपालची अटक थांबविण्यास दिल्ली हायकोर्टानं नकार दिलाय.
महत्त्वाचं म्हणजे तरुण तेजपालनं या प्रकरणात दिल्ली हायकोर्टाकडे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. तरुण तेजपालला वाचविण्यासाठी तेजपालच्या कुटुंबीयांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांचीही भेट घेतल्याचं समजतंय. कोर्टाच्या बाहेरच हे प्रकरण मिटवण्याची विनंतीही त्यांनी तिच्या कुटुंबीयांकडे केलीय. दरम्यान, तेहलकाचे एडीटर इन चीफ तरूण तेजपाल यांना कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी पीडित मुलीने केल्याचं तिच्या वकिलांनी म्हटलंय.
मुलीने पोलिसांत दिलेल्या जबाबाच्या आधारावर तेजपाल यांच्यावर बलात्काराचा खटला नोंदवला जाणार आहे. पीडित तरूणीने तेजपाल यांच्यावर केलेले आरोप अतिशय गंभीर आहेत, असं तिचे वकील श्याम केसवानी यांनी म्हटलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.