www.24taas.com, झी मीडिया, गोवा
`ख्रिसमस आता अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलाय. त्यामुळं उत्साह आणि आनंद घेऊन येणारा हा सण साजरा करण्यासाठी सारे सज्ज झालेत. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेकांची पसंती गोव्याला असते. मात्र, मुंबई टू गोवा जाण्यासाठी असलेली सर्व विमानं हाऊसफुल आहेत. त्यामुळे गोव्याला जाण्यासाठी बंगळुरू मार्गेच गोवा जावं लागणार आहे.
बंगळुरूमार्गे जाण्यासाठी नागरिकांना तब्बल ३६ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. २९ डिसेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यानच्या विविध विमान कंपन्यांचे भाडे सर्वात कमी ४,९२३ तर सर्वाधिक भाडे ३६,७६६ रुपये इतकं आहे. त्यामुळे गोव्यातील मजा, मस्ती, बिज पार्टी, म्युझिक आणि फेसाळलेल्या समुद्राच्या साक्षीने नव्या वर्षाला निरोप द्यायचा असेल तर खिशाला मोठा भुर्दंड बसणार आहे.
‘ख्रिसमस’ धूमसाठी गोवा सज्ज…
दरम्यान, गोवाही या आनंद पर्वाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालंय. गोव्याच्या बाजारपेठा ख्रिसमसच्या निमित्ताने फुलून गेल्यात. ख्रिसमससाठी खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये गर्दी पाहायला मिळतेय. गिफ्ट्स आणि सजावटीच्या वस्तू घेण्यासाठीही नागरिकांनी गर्दी केलीय. दुसरीकडे गोव्यात केक शॉप्सही सजलेत. केक आणि गोडधोड पदार्थ करण्यासाठी नागरिकांची दुकानात गर्दी होतेय. ख्रिसमससाठी विविध फ्लेवरचे आणि लज्जतदार केक इथं उपलब्ध आहेत. यात कुकीज चॉकलेटला सर्वाधिक पसंती आहे. गोव्यात खास गोवन पदार्थांनाही ख्रिसमसमध्ये पसंती असते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.