अरेरे... नऊ मराठी शाळांना लागणार टाळे!
मुंबई महापालिकेच्या नऊ मराठी शाळाना टाळे लागणार आहे.यंदाच्या शैक्षणिक वर्षात एकही विघार्थी नसलेल्या नऊ शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
Apr 27, 2013, 08:36 PM ISTसुखदा-शुभदा : मुंबईतला आणखी एक `आदर्श`
मुंबईत गाजलेल्या आदर्श घोटाळ्याचा वाद अजूनही शमला नसताना वरळीत सुखदा-शुभदा सोसायटीत सदस्य असलेल्या राजकीय नेत्यांनी अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेनं नोटीस बजावलीय.
Apr 20, 2013, 09:16 AM ISTशेकडो तरुणींनी मुंबईत काढली फुटपाथवर रात्र
मुंबईत बीएमसीत नर्सच्या मुलाखतीसाठी आलेल्या शेकडो तरुणींना बीएमसी प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा फटका बसलाय. या तरुणींना संपूर्ण रात्र फुटपाथवर काढावी लागली.
Apr 15, 2013, 08:56 AM ISTमुंबई महापालिका कापणार मुंबईतील ९९४ झाडं
`सुंदर मुंबई हरित मुंबई`चा नारा देणा-या मुंबई महापालिकेन नऊशे चौ-याण्णव झाडे कापण्याचा निर्णय घेतलाय. मुंबई सिवरेज डिस्पोजल प्रोजक्टसाठी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागान ही परवानगी दिली
Apr 2, 2013, 05:38 PM ISTकंत्राटदारांवर कारवाई पण... स्टँडिंग कमिटीत 'अंडरस्टँडिग'?
मुंबई महापालिकेच्या कामात कामचुकार करणाऱ्या सहा कंत्राटदारांना पालिकेनं ब्लॅक लिस्टेड केलंय. तसंच मलनि:सारण कामाची खोटी बीलं देणाऱ्या १७ कंत्राटदाराची चौकशी सुरू करून यातील पाच कंत्राटदारांना पालिकेनं ताबडतोब `काम बंद`चे आदेश दिलेत.
Feb 7, 2013, 09:24 AM ISTमुंबई महापालिकेचा ५८६ कोटींचा झोल; कॅगचा रिपोर्ट
मुंबई महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे कॅगनं काढलेत. रस्त्याच्या कामात ५८६ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका कॅगच्या अहवालात ठेवण्यात आलाय.
Dec 21, 2012, 05:05 PM ISTभीमसैनिकांसाठी पालिकेची जोरदार तयारी
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित मुंबई महापालिकेनं जोरदार तयारी केलीय. चैत्यभूमी ते दादर चौपाटीपर्यंत विविध नागरी सुविधा पुरवल्या गेल्यात.
Dec 6, 2012, 07:48 AM ISTबेस्ट घेणार मुंबई महापालिकेकडून कर्ज
बेस्टची आर्थिक अवस्था बिकट असल्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी बेस्टनं मुंबई महापालिकेकडून कर्ज घेण्याचा निर्णय घेतलाय. बेस्टला 12 टक्के दरानं पाच वर्षांसाठी 1 हजार 600 कोटी रुपयांचं कर्ज देण्याचा प्रस्ताव बेस्ट बैठकीत मंजूर करण्यात आलाय.
Oct 23, 2012, 08:54 AM ISTकत्तलखान्याचा पर्दाफाश... दलालांना रंगेहाथ अटक
मुंबई महापालिकेच्या देवनार कत्तलखान्यात बकरी ईदसाठी आणलेल्या बकऱ्या मेंढ्याची बेकायदेशीर विक्री उघड झालीय. हा पर्दाफाश केलाय, विरोधी पक्ष नेते ज्ञानराज निकम यांनी.
Oct 22, 2012, 06:38 PM ISTसेनेच्या दसरा मेळाव्याला परवानगी नाकारली!
शिवसेनेच्या शिवाजी पार्कवरच्या यंदाच्या दसरा मेळाव्याला मुंबई महापालिकेनं परवानगी नाकारलीय. गेली दोन वर्षं शिवाजी पार्कवर झालेल्या दसरा मेळाव्यामध्ये आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन झालं होतं.
Oct 10, 2012, 05:48 PM ISTराज ठाकरे कडाडले... खड्डे सारखे सारखे का पडतात?
मुंबई, पुणे, नाशिक अशा शहरांमध्ये वारंवार खड्डे का पडतात, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
Oct 8, 2012, 03:28 PM ISTइमारतींमध्ये आगीचा धोका टाळण्यासाठी...
काचबंद इमारतीत आगीसारखी एखादी घटना घडल्यानंतर जिवीतहानी तसच वित्तहानी टाळण्याबाबत मुंबई महापालिकेला उशिरानं का होईना मात्र उपरती झालीय.
Sep 12, 2012, 01:25 PM IST`ओसी` नसलेल्या इमारतींची नोंदच नाही
मुंबईतील साडेपाच हजार इमारतीना ओसी मिळाली नसल्याची माहीती मुख्यमंत्र्यानी विधीमंडळात दिली होती.मात्र मुंबई महापालिकेकडे किती इमारतीना ओसी मिळाली आहे? किती इमारतीना ओसी दिलेली नाही यांची माहिती पालिकेकडे नोंदच नसल्याच उघड झालंय.पालिकेन दिलेल्या माहीती अधिकारातना हे सत्य बाहेर आलंय.
Aug 9, 2012, 08:17 PM ISTअखेर पालिकेला आली जाग!
मुंबईतल्या रस्त्यांचं निकृष्टपणे काम करणाऱ्या 24 कंत्राटदारांवर महापालिकेनं 57 लाखांच्या दंडाची कारवाई केलीय. खड्डे बुजवण्याची जबाबदारी दिलेल्या इंजिनीअर्सवरही कारवाई बडगा उगारला जाणार आहे. मुंबईत आजच्या घडीला मुंबईतल्या रस्त्यांवर 10 हजार 770 खड्डे असल्याचा दावा करण्यात आलाय.
Aug 8, 2012, 04:01 AM ISTनगरसेवक होणार 'मालामाल'
मुंबई महापालिकेचे नगरसेवक मालामाल होणार आहेत. प्रत्येक नगरसेवकाला आता महिन्याला २५ हजार रुपये मानधन म्हणून मिळणार आहेत. सोबतच लॅपटॉप आणि एण्ड्रॉइड फोनचीही सुविधा आता नगरसेवकांना महापालिकेकडूनच मिळणार आहे.
Aug 1, 2012, 07:06 PM IST