www.24taas.com, मुंबई
`सुंदर मुंबई हरित मुंबई`चा नारा देणा-या मुंबई महापालिकेन नऊशे चौ-याण्णव झाडे कापण्याचा निर्णय घेतलाय. मुंबई सिवरेज डिस्पोजल प्रोजक्टसाठी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागान ही परवानगी दिली आहे.कुलाबा नेव्ही नगरातील या झाडाच्या कत्तलीला स्थानिक नगरसेवक आणि रहिवाशांनी विरोध केलायं.त्यामुळे मुंबईच्या नकाशावरील एक एकराचा हरीत पट्टा नाहीसा होणार आहे.
मुंबई सिवरेज डिस्पोजल प्रोजक्टसाठी मुंबई महापालिकेन नऊशे चौ-याण्णव झाडे कापण्याचा निर्णय घेतलाय.या ९९४ झाडापैकी सध्या साडेचारशे झाडावर पालिकेची त्वरीत कुहाड पडणार आहे.पावसाळ्यातील सांडपाडी प्रकल्पाच्या बांधकामात ही झाडे अडथळा ठरत आहेत.कुलाबा नेव्ही नगरातील या झाडाच्या कत्तलीला स्थानिक नगरसेवक आणि रहिवाशांनी विरोध केलायं.त्यामुळे मुंबईच्या नकाशावरील एक एकराचा हरीत पट्टा नाहीसा होणार आहे.या हरित पट्टयातील आंबा,वड,सुरची,कंडुलिबांची झाडासह औषधी झाडाची गणना वृक्ष प्राधिकरण विभागानच केलीयं.याच झाडाची कत्तल होणार असल्यामुळे रहिवाशांचा विरोध वाढलायं.
वृक्ष प्राधिकरण समितीत या झाडाच्या कत्तलीला सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध केला होता.मात्र आयुक्ततांनी विशेष अधिकाराचा वापर करत झाडाच्या कत्तलीचा निर्णय घेतलायं.पालिका आयुक्ततांना या निर्णयाबद्दस विचारले असता आयुक्ततांनी प्रसारमाध्यमाना उत्तर देण्याच टाळलं आहे.