जानकर आणि शेट्टींचे स्वबळावर लढण्याचे संकेत

महायुतीतील वाढता तणाव पाहता, युती तुटण्याच्याच मार्गावर आहे, असं चित्र दिसतंय. जर युती तुटली तर राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढेल, असे संकेत पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिले आहेत. स्वबळावर लढायचं असल्यास जानकर १५० जागांवर आपले उमेदवार उभे करतील. 

Updated: Sep 21, 2014, 03:27 PM IST
जानकर आणि शेट्टींचे स्वबळावर लढण्याचे संकेत title=

मुंबई: महायुतीतील वाढता तणाव पाहता, युती तुटण्याच्याच मार्गावर आहे, असं चित्र दिसतंय. जर युती तुटली तर राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढेल, असे संकेत पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिले आहेत. स्वबळावर लढायचं असल्यास जानकर १५० जागांवर आपले उमेदवार उभे करतील. 

तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनीही आपली परखड भूमिका झी मीडियाशी बोलतांना स्पष्ट केली. युती तुटली तर राजू शेट्टीही ६३ जागांवर लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 

रामदास आठवलेंनी आम्हांला महायुती टिकवायची आहे, आम्हाला दिलेल्या जागा मान्य असून शिवसेना-भाजप दोघांनीही समजूतदारपणा दाखवावा, असं रामदास आठवले म्हणाले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.