महायुती जवळपास संपुष्टात, आज माथूर घेणार उद्धव ठाकरेंची भेट

महायुती जवळपास संपुष्टात आल्यात जमा आहे. आज भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी ओम माथूर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. युती तुटण्याबाबत झी २४ तासने 69 तासांपूर्वीच मांडलेल्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाल्याचे दिसत आहे. 

Updated: Sep 22, 2014, 08:49 AM IST
 महायुती जवळपास संपुष्टात, आज माथूर घेणार उद्धव ठाकरेंची भेट title=

मुंबई : महायुती जवळपास संपुष्टात आल्यात जमा आहे. आज भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी ओम माथूर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. युती तुटण्याबाबत झी २४ तासने 69 तासांपूर्वीच मांडलेल्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाल्याचे दिसत आहे. 

 - युती तुटलीच आहे, पोपट मेलाच आहे, अशी भूमिका झी 24 तासने मांडली. 69 तासांपूर्वीच ही भूमिका, युती तुटल्याचे कोण करणार जाहीर? शिवसेना भाजप का ढकलतायत आपली जबाबदारी?

- उद्धव ठाकरेंच्या भाषणातून मनं दुरावल्याचं स्पष्ट झालं. बाळासाहेबामुळेच गोंध्रा दंगलीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी वाचले, याची आठवण उद्धव यांनी करून दिली. तर तुम्ही घेणारे आहात, अशी उद्धव म्हणालेत. याची भाजपने खिल्ली उडवली. त्यामुळे तणावात आणखी भर पडली आहे.
 
दरम्यान, महायुती संकटात आल्याने घटकपक्ष अनाथ झाले आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकरांनी स्वतंत्र निवडणूक लढण्याचे संकेत दिलेत तर राजू शेट्टी आणि रामदास आठवलेही नाराज आहेत.

भाजप-सेना युती तुटली आहे वृत्त शुक्रवारी सकाळी दहा वाजून 9 मिनिटांनी झी 24 तासचे संपादक उदय निरगुडकर यांनी दिलं होतं.. हे वृ्त्त तंतोतंत खरं ठरलं आहे. पोपट मेला आहे हे कोण जाहीर करणार एवढचं आता बाकी आहे, असे ते म्हणालेत.

शिवसेना-भाजपची जवळपास संपुष्टात आलीय. केवळ घोषणा बाकी आहे. दिल्लीमध्ये भाजपच्या निवडणूक संसदीय बोर्डाची बैठक झाली. यावेळी शिवसेनेने दिलेल्या जागांच्या प्रस्तावावर चर्चा झाली. शिवसेनेनं दिलेला प्रस्ताव नाकारण्यात आला. आता आज महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी ओम माथूर पुन्हा उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. 

दरम्यान राज्यातील भाजप नेत्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. या महत्वाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ज्येष्ठ नेते नितीन गडकरी, अनंतकुमार, सुषमा स्वराज, राजीव प्रताप रुडी, ओम माथूर उपस्थित होते. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.