मानसिक आजारांपासून वाचण्यासाठी वेळेवर करा जेवण

आपलं शरीर हे एक असं मशीन आहे, जे खूप संतुलित काम करतं. वेळेवर जेवण आणि झोपल्यानं आपलं जीवनच चांगलं होत नाही तर आपण मानसिक विकारांपासूनही दूर राहू शकतो.  सरकाडियन रिदम्स (शरीरात असलेलं जैविक घड्याळ) २४ तासांच्या चक्राचं पालन करतं आणि हार्मोन किंवा स्वभावासह शरीरातील सर्व क्रिया नियंत्रित करते.

Updated: Feb 25, 2015, 06:03 PM IST
मानसिक आजारांपासून वाचण्यासाठी वेळेवर करा जेवण title=

मॉन्ट्रियल/नवी दिल्ली: आपलं शरीर हे एक असं मशीन आहे, जे खूप संतुलित काम करतं. वेळेवर जेवण आणि झोपल्यानं आपलं जीवनच चांगलं होत नाही तर आपण मानसिक विकारांपासूनही दूर राहू शकतो.  सरकाडियन रिदम्स (शरीरात असलेलं जैविक घड्याळ) २४ तासांच्या चक्राचं पालन करतं आणि हार्मोन किंवा स्वभावासह शरीरातील सर्व क्रिया नियंत्रित करते.

मोंट्रियलचे डगलस मेंटल हेल्थ युनिव्हर्सिटी इंस्टिस्टुट तसंच मॅकगिल युनिव्हर्सिटीच्या काई-फ्लोरियन स्टॉर्च यांनी सांगितलं, 'आपल्या शरीरातील कार्य २४ तासांसह ४ तासांच्या एका चक्रांनी प्रभावित होतात, ज्याला अल्ट्रेडियन रिद्म्स असं म्हणतात.'

चार तासांचा अल्ट्रेडियन रिद्म्स मेंदूमध्ये असलेलं एक मुख्य रसायन 'डोपामिन'नं प्रेरित होतो. शरीरात जेव्हा डोपामिनची पातळी अनियंत्रित होते, तेव्हा ४ तासांचा रिदम्स ४८ तास खेचू शकतो. अनुवांशिक रूपानं हे संशोधन उंदिरांवर केलं गेलं. अभ्यासात स्टॉर्च यांच्या टीमनं याबद्दल खुलासा केलाय की, झोप येण्यात होणारा त्रास, अल्ट्रेडियन रिद्म्स जेनरेटरमध्ये असंतुलनाचा परिणाम आहे. जेव्हा की पहिले सर्काडियन रिद्म्समध्ये गडबडीचा परिणाम मानला जातो. हे अध्ययन 'ईलाइक' या जर्नलमध्ये प्रकाशित झालाय. 

(एजंसी इनपुटसह)

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.