बजेट २०१५: 'अच्छे दिन' येणार, टॅक्स कमी होणार!

आता आपले 'अच्छे दिन' येणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्रालय डायरेक्ट टॅक्सच्या संरचनेत फेरबदल करणार असल्याची माहिती मिळतेय. म्हणजेच इन्कम टॅक्समध्ये केवळ कपात नाही तर काही इतरही फायदे असतील. याचं कारण सरकारला वाटतं जनतेजवळ पैसा राहावा आणि तो खर्च करू शकतील. म्हणजे गुंतवणूकदारांना इथलं वातावरण आवडेल.

Updated: Feb 20, 2015, 02:54 PM IST
बजेट २०१५: 'अच्छे दिन' येणार, टॅक्स कमी होणार! title=

नवी दिल्ली: आता आपले 'अच्छे दिन' येणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्रालय डायरेक्ट टॅक्सच्या संरचनेत फेरबदल करणार असल्याची माहिती मिळतेय. म्हणजेच इन्कम टॅक्समध्ये केवळ कपात नाही तर काही इतरही फायदे असतील. याचं कारण सरकारला वाटतं जनतेजवळ पैसा राहावा आणि तो खर्च करू शकतील. म्हणजे गुंतवणूकदारांना इथलं वातावरण आवडेल.

एका इंग्रजी वृत्तपत्रातील बातमीनुसार सरकार देशात गुंतवणूक वाढवू इच्छितं. त्यासाठी कोणतीही अडचण न येण्याची काळजी घेत आहे. म्हणूनच इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्याचा विचार करत आहे आणि सेव्हिंग असणाऱ्यांना इन्सेंटिव्ह देणार असल्याचं कळतंय. यामुळं देशात गुंतवणुकीला वाव मिळेल. 

खूप दिवसांपासून एक्सपर्ट आणि आता रिझर्व्ह बँकेनं ग्राहकांना बचत करण्यासाठी प्रेरित करण्याची मागणी करत होते. यावेळी सरकार असे काही निर्णय घेणार आहे, ज्यामुळं नागरिकांना बचत करण्यात नफा मिळेल. देशात बचत करण्याची सवय कमी होत चाललीय. ज्यामुळं सरकारला आपल्या योजनांसाठी पैसा जुळवणं कठीण होतंय. 

मागील वर्षी सरकारने बजेटमध्ये इन्कम टॅक्समध्ये ५०,००० रुपयांनी मर्यादा वाढविली होती. मात्र टॅक्स स्लॅब तसंच ठेवलं होतं. आता सरकार टॅक्स स्लॅबमध्येच वाढ करण्याची इच्छा ठेवतंय. 

सरकार इन्कम टॅक्सची तरतूद 80C मध्ये वाढ करू शकतं. आता या अंतर्गत दीड लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीला परवानगी आहे. मात्र याला वाढवून २ लाख करणार असल्याचं बोललं जातंय. याशिवाय सरकार काही इतर पद्धतीनं सूट देण्यावर विचार करत आहे. जेणेकरून लोकं पहिले पेक्षा जास्त खर्च करतील आणि देशात गुंतवणूक वाढेल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.