स्टीव्हन स्मिथ

video :...आणि स्मिथ ओक्साबोक्शी रडला

द. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसामन्यादरम्यान बंदी घालण्यात आलेला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ याने आज पत्रकार परिषद घेतली. बॉल कुरतडल्याप्रकरणाची संपूर्ण जबाबदारी त्याने यावेळी घेतली. माझे सर्व सहकारी, क्रिकटचे चाहते आणि सर्व ऑस्ट्रेलियन्सची मी माफी मागतो. आय अॅम सॉरी. मी याप्रकरणाची संपूर्ण जबाबदारी घेतो, असे स्मिथे यावेळी स्पष्ट केले. 

Mar 29, 2018, 02:41 PM IST

स्मिथ, वॉर्नरला शिक्षा झाली ते योग्यच झाले - सचिन तेंडुलकर

द. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात बॉल टेंपरिंग प्रकरणी दोषी ठरलेल्या खेळाडूंवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केलेली कारवाई योग्य असल्याचे मत भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने व्यक्त केलीये. या प्रकरणात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि डेविड वॉर्नर यांच्यावर एका वर्षाची बंदी घालण्यात आलीये. तर कॅमेरुन बेनक्राफ्टवर ९ महिन्यांची बंदी घालण्यात आलीये

Mar 29, 2018, 12:34 PM IST

आयपीएलमध्ये नाही खेळणार स्मिथ आणि वॉर्नर

बॉल कुरतडल्याप्रकरणी वर्षभराची बंदी घालण्यात आलेले ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि उप कर्णधार डेविड वॉर्नर आयपीएलच्या ११व्या हंगामात खेळणार नाहीयेत. येत्या ७ एप्रिलपासून आयपीएलच्या घमासानाला सुरुवात होतेय. स्मिथ आणि वॉर्नर यांचा सहभाग नसल्याने आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स आणि हैदराबाद सनरायजर्स संघाना मात्र मोठा फटका बसणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आज स्मिथ आणि वॉर्नरबाबत निर्णय़ जाहीर केला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या प्रकरणात कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि डेविड वॉर्नरवर एका वर्षाची बंदी घातलीये. तर बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी कॅमेरुन बेनक्राफ्टवर ९ महिन्यांची बंदी घालण्यात आलीये. 

Mar 28, 2018, 02:27 PM IST

बॉल टेंपरिंग : स्मिथ-वॉर्नरवर एका वर्षाची तर बेनक्रॉफ्टवर ९ महिन्यांची बंदी

द. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात बॉल कुरतडल्याप्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निर्णय जाहीर केलाय. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या प्रकरणात कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि डेविड वॉर्नरवर एका वर्षाची बंदी घातलीये. तर बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी कॅमेरुन बेनक्राफ्टवर ९ महिन्यांची बंदी घालण्यात आलीये. 

Mar 28, 2018, 02:11 PM IST

ऑस्ट्रेलियाने स्वत:चीच उडवली खिल्ली

बॉल कुरतडल्याप्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कडक भूमिका घेत कसोटी कर्णधार स्टीव्हन स्मिथ, डेविड वॉर्नर आणि कॅमेरुन बेनक्राफ्ट यांना दोषी ठरवत आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी संघाबाहेर काढलेय. तर कोच डॅरेन लेहमन यांना क्लीनचिट देण्यात आलीये. बॉल टेंपरिंग प्रकरणात अडकलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघावर चहूबाजूंनी टीका होतेय. ही घटना इतकी गंभीर की ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनाही यात हस्तक्षेप करावा लागला. 

Mar 28, 2018, 12:10 PM IST

क्रिकेट ऑस्ट्रेलियाची आपातकालीन बैठक, खेळाडू आणि कोचबाबत आज निर्णय

द. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात बॉल कुरतडल्याप्रकरणी मंगळवारी द. आफ्रिकेत आपातकालीन बैठक होणार आहे. या बैठकीत कोच डॅरेन लेहमन आणि कर्णधार स्टीव्हन स्मिथच्या भविष्याचा निर्णय होणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख जेम्स सदलँड यांच्यावर कारवाईसाठी मोठा दबाव आहे. कारण बॉल टेंपरिंग प्रकरणावरुन ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सवर चहूबाजूंनी टीका होते. ऑस्ट्रेलियन मीडियाने तर हे प्रकरण म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या संस्कृतीला काळिमा असल्याचे म्हटलेय. 

Mar 27, 2018, 01:54 PM IST

बॉल टेंपरिंग प्रकरण, हरभजनची आयसीसीवर जोरदार टीका

बॉल टेंपरिंग प्रकरणी ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर कॅमेरन बेनक्राफ्टवर केवळ मॅच फीवर ७५ टक्के दंड आणि बंदी न घातल्याप्रकरणी भारताचा स्पिनर हरभजन सिंगने नाराजी व्यक्त केलीये. हरभजनने यावेळी २००१मधील दक्षिण आफ्रिके टेस्टची आठवण करुन दिली. या कसोटीदरम्यान पाच भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, शिवसुंदर दास, दीपदास गुप्ता यांच्यावर मॅच रेफ्री माईक डेनिस यांनी विविध आरोपांखाली कमीत कमी एका कसोटीवर बंदी घातली होती. 

Mar 26, 2018, 03:31 PM IST

बॉल टेंपरिंग प्रकरण क्रिकेटसाठी काळा दिवस - ऑस्ट्रेलियन मीडिया

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटीदरम्यान घडलेले बॉल टेंपरिंगप्रकरण हे खेळासाठी काळा दिवस असल्याचे ऑस्ट्रेलियन मीडियाने म्हटलेय. न्यूलँडसमध्ये द. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीदरम्यान बॉल टेंपरिंगची घटना घडली. यावरुन कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर जोरदार टीका केली जातेय. 

Mar 26, 2018, 01:34 PM IST

...तर स्मिथ-वॉर्नरवर लागू शकते आयुष्यभराची बंदी

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना बॉल कुरतडल्याच्या प्रकरणामुळे अधिक चर्चेत आलाय. आता असंही म्हटलं जातय की क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपले नियम पाळले तर स्टीव्हन स्मिथ आणि डेविड वॉर्नर यांच्यावर आजीवन बंदी येऊ शकते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या कोड ऑफ बिहेवियरनुसार या दोघांना शिक्षा सुनावली जाऊ शकते. 

Mar 26, 2018, 12:26 PM IST

विराटची नक्कल करण्याचा प्रयत्न करतो, स्मिथचे विधान

भारताचा कर्णधार विराट कोहली सध्याच्या काळातील सर्वात यशस्वी क्रिकेटर ठरतोय. दक्षिण आफ्रिकेतही विराट कोहलीने सिद्ध केले की परदेशातील खेळपट्ट्यांवरही तो रेकॉर्ड बनवू शकतो. 

Feb 23, 2018, 04:02 PM IST

ऑस्ट्रेलियाला सतावतेय पांड्याची भिती, पराभवानंतर स्मिथने केलंय मोठं विधान

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने तिसऱ्या वनडेतील दमदार कामगिरीसाठी हार्दिक पांड्याचे कौतुक केलेय. पांड्याने रविवारच्या वनडेत जबरदस्त अर्धशतक ठोकताना भारताला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.

Sep 25, 2017, 03:40 PM IST

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ झाला एंगेज

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ आपली गर्लफ्रेंड डॅनी विलिस हिच्यासोबत एंगेज झालाय. सोशल मीडियावरुन त्याने याची कबुली दिलीये. 

Jun 30, 2017, 07:29 PM IST

मुंबई वि पुणे, अखेरची ओव्हर ठरली निर्णायक

आयपीएलच्या दहाव्या हंगामातील मुंबई इंडियन्स आणि रायजिंग पुणे सुपरजायंट यांच्यातील अखेरचा सामना चांगलाच रंगतदार ठरला. 

May 22, 2017, 12:04 AM IST

आयपीएल १० : मुंबईला दहाव्या हंगामाचे जेतेपद, पुण्यावर एका धावेने विजय

अखेरच्या चेंडूपर्यंत अटीतटीच्या रंगलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने रायजिंग पुणे सुपरजायंटवर विजय मिळवला आणि आयपीएलच्या दहाव्या हंगामाचे जेतेपद मिळवले. 

May 21, 2017, 11:53 PM IST