स्मिथ अव्वल तर कोहलीची घसरण

Jan 10, 2018, 16:26 PM IST
1/12

Virat kohli is third

Virat kohli is third

पहिल्या सामन्यातील पराभवामुळे विराट कोहली वर्ल्ड रँकिंगमध्ये एका स्थानाने घसरुन तिसऱ्या स्थानावर घसरलाय. कोहलीचे या सामन्याआधी ८९३ अंक होते. त्याचा फॉर्म पाहता तो ९००चा आकडा पार करेल असे वाटत होते. मात्र पहिल्या सामन्यात कोहलीने ५ आणि २६ धावा केल्या. ज्यामुळे त्याचे ८८० अंक झाले आणि तो तिसऱ्या स्थानावर घसरला.  

2/12

Kane Willomson is fourth

Kane Willomson is fourth

न्यूझीलंडचा केन विल्यमसन्स कसोटी रँकिंगमध्ये चौथ्या स्थानावर आहे. त्याच ८५५ गुण आहेत.   

3/12

Cheteshwar Pujara is Fifth

Cheteshwar Pujara is Fifth

पुजाराने या कसोटीत २६ आणि ४ धावा केल्या. त्यामुळे त्याचे २५ अंकाचे नुकसान झाल्याने तो ८४८ अंकासह तिसऱ्या स्थानावरुन पाचव्या स्थानावर घसरलाय.

4/12

David Warner is sixth

David Warner is sixth

ऑस्ट्रेलियाचा ओपनर डेविड वॉर्नर ८२७ गुणांसह सहाव्या स्थानावर कायम आहे.   

5/12

Azhar Ali is Seventh

Azhar  Ali is Seventh

पाकिस्तानचा अजहर अलीच्या रँँकिंगमध्ये दोन स्थानांनी सुधारण झालीये. रँकिंगमध्ये त्याचे ७५५ अंक होते. मात्र हाशिम आमला आणि कुकची स्थानात घसरण झाल्याने त्याला दोन स्थानांचा फायदा झाला.   

6/12

Dinesh chandimal is eighth

Dinesh chandimal is eighth

श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडीमल भारताविरुद्धच्या कामगिरीमुळे दहाव्या स्थानावर होता. मात्र कुक आणि हाशिम आमलाची घसरण झाल्याने त्यालाही अजहर अलीप्रमाणे दोन स्थानांचा फायदा झाला.   

7/12

Alsitair cook is ninth

Alsitair cook is ninth

अॅलेस्टर कुक अॅशेस सीरिजमधील पहिल्या चार कसोटीत सपशेल अपयशी ठरला. त्याने चौथ्या टेस्टमध्ये दुहेरी शतक झळकावले त्यामुळे त्याचे तितकेसे नुकसान होऊ शकले नाही. अॅशेसजच्या पाचव्या कसोटीत दोन्ही डावांत तो पुन्हा अपयशी ठरला. कुकचे ताज्या रँकिंगनुसार ७४२ अँक आहेत.   

8/12

Hashim Amla slips down to ten

Hashim Amla slips down to ten

द. आफ्रिकेचा हाशिम आमलाला भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत काही खास कामगिरी करता आली नाही. त्याने पहिल्या कसोटीत केवळ तीन आणि चार धावा केल्या. ज्यामुळे रँकिंगमध्ये तो ७७६वरुन ७४०वर पोहोचलाय.  

9/12

Steve Smith is number one

Steve Smith is number one

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ ९४७ अंकांसह अव्वल स्थानावर आहे. अॅशेस सीरिजमध्ये इंग्लंडला ४-० अशी धूळ चारणाऱा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथ अॅशेज सिरीजमध्ये प्लेयर ऑफ दी सीरिज घोषित करण्यात आले.   

10/12

joe root is no. 2

joe root is no. 2

दुसरीकडे इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुटने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीत १४१ धावा केल्या. यामुळे त्याने २८ अंकांची झेप घेतली असून त्याने दुसरे स्थान गाठलेय. कोहलीला मागे टाकत त्याने दुसरे स्थान मिळवलेय.   

11/12

hardik Pandya jumped high

hardik Pandya jumped high

हार्दिक पांड्याने केपटाऊनमध्ये शानदार प्रदर्शनाच्या जोरावर रँकिंगमध्ये मोठी झेप घेतलीये. केपटाऊनमधील पहिल्या कसोटीत ९३ धावा बनवल्यामुळे त्याने २४ स्थानांनी झेप घेत तो ४९व्या स्थानावर पोहोचलाय.   

12/12

shikhar, rohit and Murli

shikhar, rohit and Murli

चेतेश्वर पुजारा, शिखर धवन, मुरली विजय आणि रोहित शर्मा या फलंदाजांनाही न्यूलँड्सच्या मैदानावर खराब प्रदर्शनाचे परिणाम भोगावे लागलेत.