video :...आणि स्मिथ ओक्साबोक्शी रडला

द. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसामन्यादरम्यान बंदी घालण्यात आलेला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ याने आज पत्रकार परिषद घेतली. बॉल कुरतडल्याप्रकरणाची संपूर्ण जबाबदारी त्याने यावेळी घेतली. माझे सर्व सहकारी, क्रिकटचे चाहते आणि सर्व ऑस्ट्रेलियन्सची मी माफी मागतो. आय अॅम सॉरी. मी याप्रकरणाची संपूर्ण जबाबदारी घेतो, असे स्मिथे यावेळी स्पष्ट केले. 

Updated: Mar 29, 2018, 02:57 PM IST
video :...आणि स्मिथ ओक्साबोक्शी रडला title=

सिडनी : द. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसामन्यादरम्यान चेंडू कुरतडल्याप्रकरणी बंदी घालण्यात आलेला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ याने आज पत्रकार परिषद घेतली. बॉल कुरतडल्याप्रकरणाची संपूर्ण जबाबदारी त्याने यावेळी घेतली. माझे सर्व सहकारी, क्रिकटचे चाहते आणि सर्व ऑस्ट्रेलियन्सची मी माफी मागतो. आय अॅम सॉरी. मी याप्रकरणाची संपूर्ण जबाबदारी घेतो, असे स्मिथे यावेळी स्पष्ट केले. 

यावेळी स्मिथला मात्र आपले अश्रू आवरता आले नाही. मला हे दु:ख सलतय.मी मनापासून माफी मागतो. मी क्रिकेटवर प्रेम करतो. माझ्यामुळे ऑस्ट्रेलिया, क्रिकेटचे चाहते आणि इतरांना खूप त्रास झाला त्याबद्दल मी माफी मागतो, चेंडू कुरतडणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक. घडल्याप्रकाराची सर्व जबाबदारी माझी आहे, असे पुढे स्मिथ म्हणाला. 

दरम्यान, या प्रकरणामुळे आपल्या घरच्यांना कशी मानहानी सहन करावी लागली. आई-वडिलांच्या डोळ्यात आपल्यामुळे अश्रू आल्याचे तो म्हणाला. 

स्मिथची कबुली

ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्हन स्मिथनं चेंडू कुरतडल्याची बाब मान्य केली आणि क्रिकेटच्या दुनियेला मोठा धक्का बसला. तिस-या कसोटीच्या तिस-या दिवशी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू कॅमरुन बेनक्रॉफ्ट चेंडूशी छेडछाड करत असल्याचं समोर आलं. तिसऱ्या दिवशी लंच सुरु असताना बॉलची छेडछाड करण्याचं वरिष्ठ खेळाडूंनी ठरवल्याचं स्मिथनं मान्य केलं. लंचमध्ये झालेल्या बैठकीत स्मिथ आणि वॉर्नर असल्यामुळे या दोघांवर कारवाई करण्यात आली.

अशी झाली बॉलशी छेडछाड

दक्षिण आफ्रिकेच्या दुस-या डावातील ४३ व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर असलेला क्रिकेटपटू बेनक्रॉफ्ट बॉलशी छेडछाड करताना दिसला. बॉलला स्विंग मिळावा यासाठी त्याच्याकडून बॉलला टेप लावण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. त्यामुळे बॉल खेळपट्टीवर आदळून स्विंग मिळेल असं सांगण्यात येतं.बेन्क्रॉफ्टचा रडीचा डाव पंचाच्या लक्षात आला तेव्हा त्यांनी याबाबत विचारणा केली. सुरुवातीला बेन्क्रॉफ्टनं या सगळ्या गोष्टी नाकारल्या. मात्र मैदानातील बड्या स्क्रीनवर बेन्क्रॉफ्टचा रडीचा डाव दाखवला गेला आणि तो गोंधळला. तिस-या दिवसाच्या खेळानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथनं बेन्क्रॉफ्टच्या बॉलशी छेडछाडीची जबाबदारी स्वीकारली.