बॉल टेंपरिंग प्रकरण क्रिकेटसाठी काळा दिवस - ऑस्ट्रेलियन मीडिया

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटीदरम्यान घडलेले बॉल टेंपरिंगप्रकरण हे खेळासाठी काळा दिवस असल्याचे ऑस्ट्रेलियन मीडियाने म्हटलेय. न्यूलँडसमध्ये द. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीदरम्यान बॉल टेंपरिंगची घटना घडली. यावरुन कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर जोरदार टीका केली जातेय. 

Updated: Mar 26, 2018, 01:34 PM IST
बॉल टेंपरिंग प्रकरण क्रिकेटसाठी काळा दिवस - ऑस्ट्रेलियन मीडिया title=

केपटाऊन : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटीदरम्यान घडलेले बॉल टेंपरिंगप्रकरण हे खेळासाठी काळा दिवस असल्याचे ऑस्ट्रेलियन मीडियाने म्हटलेय. न्यूलँडसमध्ये द. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीदरम्यान बॉल टेंपरिंगची घटना घडली. यावरुन कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर जोरदार टीका केली जातेय. 

पॅट्रिक स्मिथने द ऑस्ट्रेलियनमध्ये म्हटलंय, आम्ही असे संघ पाठवले ज्यांच्या खिशात धन, टेप आणि पिचवरील घाण यांनी भरले होते. हे खेळाचे नियम आणि शिष्टाचाराच्या विरुद्ध आहे. वरिष्ठ खेळाडूंनी हे कृत्य केले. ज्यामुळे खेळाची बदनामी तर झालीच मात्र देशाचे नावही खराब झालेय. 

क्रिकेट ऑस्ट्रेलियाला संघाच्या कर्णधाराबाबत मोठा निर्णय घेणे गरजेचे आहे. जर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार याबाबत विचार करु शकतो तर त्याच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे आणि मला वाटते की स्टीव्हन स्मिथ यामुळे त्याचे कर्णधारपद गमावू शकतो. 

ऑस्ट्रेलियाच्या या वर्तनामुळे चहूबाजूंनी ऑस्ट्रेलियन संघ आणि स्मिथवर जोरदार टीका केली जातेय. अनेक माजी खेळाडूंनी, कमेंटेटर्सनी स्मिथला हटवण्याची मागणी केलीये.

हे आहे प्रकरण

द. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात केपटाऊन येथे सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीदरम्यान ही घटना घडली. आफ्रिका फलंदाजी करत होत. ३४वे षटक सुरु होती. यावेळी मार्करम आणि एबी डे विलियर्स खेळत होते. त्याचवेळी बेनक्राफ्ट एका चिपसारख्या वस्तूसकट कॅमेऱ्यात कैद झाला. सुरुवातीला ही बॉल चमकवण्यासाठी चिप असल्याचे सांगितले गेले. त्याने ती चिप बॉलवर घासली. दरम्यान, यावेळी अंपायरने बेनक्राफ्टला हटकले. तसेच अंपायरसमोर येण्यासाठी बेनक्राफ्टने पिवळ्या रंगाची वस्तू अंतवस्त्रात ठेवताना अंपायरने पाहिले होते. जेव्हा अंपायर त्याच्याकडे पोहोचले तेव्हा त्यांनी ब्रेनकाफ्टच्या पँटचा खिसा चेक करुन पाहिला. यावेळी खिशात अनेक वस्तू होत्या. 
 
यानंतर कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि बेनक्राफ्टने याप्रकरणी आपली चूक मान्य केली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत स्मिथने बॉल टेंपरिंगचे प्रकरणाची जबाबदारी घेतली. तसेच बेनक्राफ्टनेही बॉल टेंपरिंग केल्याचे मान्य केले. 

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी व्यक्त केली नाराजी

ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या या वर्तनामुळे ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनीही नाराजी व्यक्त केलीये. ही शरमेची घटना असल्याचे पंतप्रधान मेल्कोन टर्नबुल यांनी म्हटलंय.