केपटाऊन : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना बॉल कुरतडल्याच्या प्रकरणामुळे अधिक चर्चेत आलाय. आता असंही म्हटलं जातय की क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपले नियम पाळले तर स्टीव्हन स्मिथ आणि डेविड वॉर्नर यांच्यावर आजीवन बंदी येऊ शकते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या कोड ऑफ बिहेवियरनुसार या दोघांना शिक्षा सुनावली जाऊ शकते.
आयसीसीने स्मिथवर एका सामन्याची बंदी घातलीये. त्यासोबत त्याची मॅच फीही कापून घेण्यात आले. सामन्यादरम्यान बॉल टेंपरिंग करणाऱ्या कॅमेरन बेनक्राफ्टवर मानधनातील ७५ टक्के दंड ठोठावण्यात आलाय.
याप्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाही तपास करतेय. इएसपीएन क्रिकइन्फोनुसार जर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपले नियम पाळले तर स्मिथ आणि वॉर्नरवर आजीवन बंदी घातली जाऊ शकते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचाही तपास सुरु आहे.
नियमांनुसार, जर एखादा खेळाडू खेळाच्या नियमाविरुद्ध खेळत असेल तर नियम ४२नुसार त्या खेळाडूवर आजीवन बंदी घातली जाऊ शतते. बॉल टेंपरिंगचे प्रकरण ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या नियम २.२.८ कलमांतर्गत आहे.
सध्याचे आकडे आणि ऑस्ट्रेलियन संघाची स्थिती पाहिली असता क्रिकेट ऑस्ट्रेलिया बंदी घालण्याची शिक्षा सुनावेल की नाही याबाबत शंकाच आहे. दरम्यान, असे घडल्यास ऑस्ट्रेलियासाठी हा मोठा झटका अशेल. कारण सध्या ऑस्ट्रेलियन संघ बदलातून जातोय. त्यामुळे या मुख्य खेळाडूंवर बंदी घातणे यसोपे नसेल.
याप्रकरणी ऑस्ट्रेलियन सरकारने कडक भूमिका घेतलीये. या घटनेने ऑस्ट्रेलियन क्रिकेटची प्रतिमा मलीन झाली असल्याचे ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी म्हटलंय.