सीबीआय

`बलात्कार रोखता येत नसेल तर त्याचा आनंद घ्या`

सीबीआयचे संचालक रंजीत सिन्हा यांच्या ‘बलात्कार’ विषयीच्या मतांनी चांगलाच वादंग निर्माण केलाय. ‘बलात्कार रोखू शकत नसाल तर त्याचा आनंद घ्या’ असं वक्तव्य रंजीत सिन्हा यांनी एका पत्रकार परिषदेत केलंय.

Nov 13, 2013, 09:58 AM IST

कोळसा घोटाळा- कुमार मंगलम बिर्लांविरोधात एफआयआर

कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं एफआयआर दाखल केलाय. उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला आणि हिंदाल्को कंपनीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलाय.

Oct 15, 2013, 12:45 PM IST

आदर्श घोटाळा : शिंदेंना सीबीआयकडून क्लीन चीट

‘आदर्श’ घोटाळ्याप्रकरणी सुशीलकुमार शिंदे यांना सीबीआयनं क्लीन चीट दिलाय. पीटीआय या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलंय. या प्रकरणातून सीबीआयनं क्लीन चीट दिल्यानं निश्चितच केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंना दिलासा मिळालाय.

Sep 19, 2013, 12:51 PM IST

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या : तर तपास सीबीआयकडे - मुख्यमंत्री

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेक-यांचा शोध घेण्यासाठी अन्य तपास यंत्रणांची मदत घेतली जाते. या प्रकरणात गरज पडली तर सीबीआयकडेही हे प्रकरण सोपवण्याची तयारी असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. ते कोल्हापुरात बोलत होते. या प्रकरणी अद्याप एकाही व्यक्तीला अटक केली नसल्याचं त्यांनी सांगितलं.

Sep 7, 2013, 09:00 AM IST

दाभोलकरांच्या हत्येचा तपास सीबीआयकडं द्या - मुंडे

पुण्यात सर्वात जास्त गुन्हेगारी आहे. चांगल्या IPS अधिका-यांना पुण्यात पोस्टिंग दिलं जात नाही, असा आरोप भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येचा तपास सीबीआयकडं द्यावा. पुणे पोलिसांकडून या प्रकरणाची उकल होणं अशक्य आहे, अशी टीकाही त्यांनी केलीय.

Sep 3, 2013, 08:56 AM IST

`थंड डोक्यानं रचला इशरतच्या फेक एन्काउंटरचा कट`

आरोपपत्रात म्हटल्यानुसार, पोलीस आणि मारल्या गेलेल्या चौघांमध्ये कोणत्याही प्रकारची चकमक झालीच नव्हती...

Jul 4, 2013, 09:13 AM IST

इशरत `फेक` एन्काउंटर : चार्जशीटमध्ये मोदींचं नाव नाही

इशरत जहाँ एन्काऊंटर प्रकरणात सीबीआयनं अहमदाबादच्या सीबीआय विशेष कोर्टात आरोपपत्र दाखल केलंय.

Jul 4, 2013, 08:58 AM IST

इशरत जहाँ एन्काउंटर प्रकरणी उद्या चार्जशीट

इशरत जहाँ एनकाऊंटर प्रकरणी उद्या सीबीआय आरोपपत्र दाखल करणारेय. या आरोपपत्रामध्ये काही नवी नावं समाविष्ट होण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय.

Jul 2, 2013, 11:47 PM IST

कायदामंत्री अश्वनीकुमार यांच्या अडचणीत वाढ!

कायदामंत्री अश्वनीकुमार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. काल सीबीआयने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरुन सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय आणि सरकारवर कडक शब्दात ताशेरे ओढले.

May 9, 2013, 07:45 PM IST

सीबीआय म्हणजे सरकारचा पाळीव पोपट- सुप्रीम कोर्ट

सीबीआय म्हणजे सरकारचा पाळीव पोपट आहे, अशा शब्दांत सुप्रीम कोर्टानं ताशेरे ओढलेत. कोळसा खाण घोटाळा प्रकरणी आज झालेल्या सुनावणीत कोर्टानं सरकार आणि सीबीआयला कठोर शब्दांत खडसावलं.

May 8, 2013, 11:47 PM IST

महेशकुमारच्या अड्ड्यातून करोडोंची बेनामी संपत्ती जप्त

रेल्वेत पदोन्नती मिळावी यासाठी ९० लाख रुपये लाच देणाऱ्या पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक महेश कुमार प्रकरणात सीबीआयनं पुन्हा एकदा धाड सत्र सुरु केलंय.

May 8, 2013, 08:32 AM IST

कोळसा घोटाळाः सरकारचे पाय खोल रुतले

कोळसा घोटाळ्यात सरकारचे पाय आणखीनंच रूतले आहेत. चौकशी अहवालात फेरफारासंदर्भात सीबीआय संचालकांनी सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या अहवालात सरकारचं पितळ उघडं पडलंय.

Apr 26, 2013, 04:54 PM IST

भंडारा बलात्कार प्रकरणाची सीबीआय चौकशी

भंडारा बलात्कार प्रकरणाच्या सीबीआय चौकशी होणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केली.

Apr 1, 2013, 06:51 PM IST

पाठिंबा काढला; स्टॅलिनच्या घरावर छापे

केंद्रातील यूपीए सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर २४ तासांच्या आत डीएमकेचे नेते करुणानिधी यांचा मुलगा एम. के. स्टॅलिन यांच्या घरावर सीबीआयचे छापे पडलेत.

Mar 21, 2013, 10:24 AM IST

डीएसपी हत्याकांड : गोळ्या मारण्यापूर्वी बेदम मारहाण

पोलीस उपअधिक्षक झिया-उल-हक हत्या प्रकरणाला नवं वळण लागलंय. झिया उल हक यांना गोळी मारण्यापूर्वी त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा खुलासा, पोस्टमॉर्टेम अहवालात करण्यात आलाय.

Mar 7, 2013, 11:28 AM IST