डीएसपी हत्याकांड : गोळ्या मारण्यापूर्वी बेदम मारहाण

पोलीस उपअधिक्षक झिया-उल-हक हत्या प्रकरणाला नवं वळण लागलंय. झिया उल हक यांना गोळी मारण्यापूर्वी त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा खुलासा, पोस्टमॉर्टेम अहवालात करण्यात आलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 7, 2013, 11:28 AM IST

www.24taas.com, लखनऊ
पोलीस उपअधिक्षक झिया-उल-हक हत्या प्रकरणाला नवं वळण लागलंय. झिया उल हक यांना गोळी मारण्यापूर्वी त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा खुलासा, पोस्टमॉर्टेम अहवालात करण्यात आलाय.
उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमध्ये गेल्या शनिवारी लोकांच्या गर्दीत शिकार ठरलेले शहीद पोलीस उपअधिक्षक झिया उल हक यांच्या शरीरावर १२ जखम मिळाल्यात. एव्हढच नाही, तर त्यांच्यावर दोन गोळ्या झाडण्यात आल्याच्या आणि पुन्हा त्या गोळ्यांना शरीरातून बाहेर काढण्यात आल्याच्या खुणाही शरीरावर आढळल्यात. हक यांच्यावर त्यांच्याच सरकारी पिस्तूलातून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.
या प्रकरणात यूपीचे माजी कॅबिनेट नेता रघुराज प्रताप सिंह ऊर्फ राजा भैय्या याला हक यांना या प्रकरणातील प्रमुख आरोपी बनवलं गेलंय. उत्तर प्रदेशचा बाहुबली नेता आणि अखिलेश सरकारमधील मंत्री रघुराज प्रतापसिंग उर्फ राजाभय्या यानं मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेशच्या अखिलेश सरकारमध्ये तो नागरी पुरवठा मंत्रीपदावर होता.

तपास सीबीआयकडे
दरम्यान, या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे सोपवण्यात आलाय. गुरुवारपासून सीबीआय या प्रकरणाचा तपास नव्यानं सुरू करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राज्य सरकारनं केंद्राकडे सीबीआय चौकशीची मागणी केली होती. या मागणीला केंद्रानं हिरवा कंदील दाखवलाय.