सीबीआय

चिदंबरम यांच्या पत्नी नलिनी यांची सीबीआय चौकशी

काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या पत्नी नलिनी चिदंबरम यांची शारदा चिट फंड घोटाळा प्रकरणी सीबीआयने चौकशी केली आहे. सर्वोच्च न्यायालयामधील वकिली करत असलेल्या नलिनी यांची शनिवारी शारदा उद्योगसमूहातर्फे त्यांना देण्यात आलेल्या कायदेशीर मानधनासंदर्भात ही चौकशी करण्यात आली. 

Sep 21, 2014, 10:28 PM IST

‘क्लोजर रिपोर्ट’नंतर CBI अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली

आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्ये प्रकरणी सीबीआयने मावळ कोर्टात आठच दिवसांपूर्वी क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. त्यानंतर आता, या गुन्ह्याचे तपास अधिकारी एस. पी. सिंग यांची तडकाफडकी बदली करण्यात आलीय.

Aug 22, 2014, 12:47 PM IST

शेट्टी प्रकरणातील CBI क्लोजर रिपोर्टवर अण्णांची टीका

शेट्टी प्रकरणातील CBI क्लोजर रिपोर्टवर अण्णांची टीका

Aug 12, 2014, 09:34 AM IST

आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टींची हत्या कुणी केली?

तळेगाव दाभाडे मधील आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्या प्रकरणाला आज धक्कादायक वळण लागले. या प्रकरणाचा तपास बंद करण्याचा अहवाल सीबीआयने न्यायालयाला दिला आहे. त्यामुळे सतीश शेट्टी हत्या प्रकरणाचे गुढ आज साडेचार वर्षानंतरही कायम आहे.

Aug 11, 2014, 11:16 PM IST

गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी होणार

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी होणार आहे.

Jun 16, 2014, 01:10 PM IST

एन्काऊंटर प्रकरणी अमित शहा हाजीर हो

तुलसीराम प्रजापती एन्काऊंटर प्रकरणी भाजपा नेता अमित शहा यांच्यासह 18 आरोपींना आज कोर्टात हजर रहावं लागणार आहे. 9 मेला मुंबईतल्या स्पेशल सीबीआय कोर्टानं अमित शहा आणि इतर आरोपींना समन्स जारी केलं होतं.

May 23, 2014, 08:23 AM IST

दाभोलकरांच्या हत्येच्या तपास सीबीआयकडे देण्याचे आदेश

डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येची चौकशी सीबीआयकडे देण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. केतन तिरोडकर यांनी याबाबत याचिका दाखल केलीय.

May 9, 2014, 04:27 PM IST

दाभोलकरांच्या हत्येचा तपास 'सीबीआय'कडे सोपवणार?

डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येची चौकशी चौकशी सीबीआयकडे देण्यात यावी का यावर मुंबई हायकोर्ट आज निर्णय सुनावणार आहे. केतन तिरोडकर यांनी याबाबत याचिका दाखल केलीय.

May 9, 2014, 10:19 AM IST

कोलगेट प्रकरणी खासदार विजय दर्डा यांच्यावर समन्स

कोलगेट घोटाळ्याप्रकरणी राज्यसभा सदस्य खासदार विजय दर्डा आणि इतर तिघांविरोधात सीबीआयनं दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेऊन सीबीआयच्या विशेष न्यायालयानं त्यांना येत्या २३ मे रोजी न्यायालयात हजर राहण्यासंबंधी समन्स जारी केलंय. न्या. मधू जैन यांनी यासंबंधीचा आदेश दिला.

May 8, 2014, 05:47 PM IST

सीबीआय दाभोलकरांच्या हत्येच्या चौकशीस तयार

डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येची चौकशी करण्यास सीबीआय तयार आहे. सीबीआयने यावर मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे.

Apr 23, 2014, 04:18 PM IST

३००० कोटींपेक्षा जास्त काळं धन जप्त!

केंद्रीय आर्थिक गुप्तचर विभागानं आर्थिक वर्ष २०१३ च्या पहिल्या सहा महिन्यांतच तब्बल ३००० कोटी रुपयांच्या काळ्याधनाचा पर्दाफाश केलाय. गुप्तचर विभागानं वर्षात कर चोरी आणि काळा पैसा बाळगणारे १७४ प्रकरणे उघडकीस केले आहेत. ‘सीबीआय’ या गुन्हेगारांची अधिक चौकशी करत आहे.

Nov 27, 2013, 05:34 PM IST

रंजीत सिन्हा यांना उपरती; आपल्याच वक्तव्याला दिला फाटा

‘सीबीआय’चे संचालक रंजीत सिन्हा यांनी ‘बलात्कारा’वर दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर सगळीकडून टीका झाली. त्यानंतर मात्र त्यांना यावर स्पष्टीकरण देण्याची उपरती सुचलीय.

Nov 13, 2013, 01:09 PM IST